Murlidhar Mohol : इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, मुरलीधर मोहोळ यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Murlidhar Mohol इंडिगो एअरलाईनच्या ऑपरेशनल समस्यांमुळे कालपासून पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली या प्रमुख विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी माहिती त्यांनीकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. Murlidhar Mohol

मुरलीधर मोहोळ म्हणाले, DGCA च्या FDTL आदेशांना तत्काळ स्थगिती देण्यात आली असून, प्रवासी हित लक्षात घेऊन आणि विमान सुरक्षेत कोणतीही तडजोड न करता हे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रालयात 24×7 नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून तेथून परिस्थितीवर देखरेख ठेवली जात आहे. केंद्र सरकारने या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार ही परिस्थिती पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहे. आम्हाला विश्वास आहे की पुढील एक-दोन दिवसांत विमानसेवा स्थिर होतील आणि तीन दिवसांत पूर्णपणे सामान्य होतील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. Murlidhar Mohol



इंडिगो एअरलाईनच्या ऑपरेशनल समस्यांमुळे विस्कळीत झालेले विमान उड्डाणांचे वेळापत्रक आज मध्यरात्रीपर्यंत स्थिर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, पुढील काही दिवसांत संपूर्ण सेवा पूर्ववत होऊन विमान वाहतुकीमध्ये स्थिरता येईल. प्रवाशांना घरी बसूनही विमानांच्या विलंबाची माहिती मिळवता यावी यासाठी इंडिगो आणि इतर कंपन्यांनी विकसित केलेल्या माहिती प्रणालीचा उपयोग करता येणार आहे. उड्डाण रद्द झाल्यास, इंडिगो तिकिटांसाठी प्रवाशांना स्वयंचलितपणे पूर्ण परतफेड सुनिश्चित करेल.

प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ज्या प्रवाशांचे विमान रद्द झाल्यामुळे ते विमानतळावर अडकले असतील, त्यांची निवासाची व्यवस्था विमान कंपन्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये केली जाईल. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी आरामखुर्ची सारख्या विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उशिरा उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना अल्पोपहार आणि इतर आवश्यक गोष्टी पुरवल्या जातील. दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा 24/7 नियंत्रण कक्ष या संपूर्ण परिस्थितीवर सतत प्रत्यक्ष वेळेवर लक्ष ठेवून आहे.

High-Level Probe Ordered Into IndiGo Incident, Says Murlidhar Mohol

महत्वाच्या बातम्या