Election Commission : निवडणूक आयोगाच्या रडारवर २० नेते, प्रचार काळातील आमिष दाखवणारी वक्तव्ये भोवणार
नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणारी वक्तव्य महायुतीतील बड्या नेत्यांना भोवण्याची शक्यता आहे.
नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणारी वक्तव्य महायुतीतील बड्या नेत्यांना भोवण्याची शक्यता आहे.
भाजपकडून एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या ‘जायबंदी’ करण्याचे अत्यंत नियोजनबद्ध प्रयत्न सुरू झाले आहेत,” असा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यासह केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्ड (KIIFB) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना २ हजार कोटी रुपयांच्या ‘मसाला बाँड’ व्यवहारातील कथित गैरव्यवहारांसंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही नोटीस १२ नोव्हेंबर रोजी देण्यात आली असून, संबंधितांना वैयक्तिकरित्या हजर राहण्याची आवश्यकता नाही.
माझ्या राजकीय प्रवासात असा गोंधळलेला आणि दबावाखाली काम करणारा निवडणूक आयोग मी कधीच पाहिला नाही, असा संताप माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
राज्यातील २४६ नगरपालिका ४२ नगरपंचायतींचे मतदान एक दिवसावर आले असताना २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक व अनाकलनीय आहे.
जनतेचे प्रश्न उपस्थित करणे, मुद्दे उपस्थित करणे ड्रामा नाही. मुद्यांच्या विषयांवर बोलण्यास परवानगी न देणं, चर्चा न करणं ड्रामा आहे. जनतेच्या प्रश्नांवर लोकशाही मार्गाने चर्चा न करणे खरा ड्रामा आहे, असे प्रत्युत्तर काॅंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी- वड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दिले.
विरोधकांनीही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. देशासाठी काय करू शकताे असे मुद्दे चर्चेत उपस्थित करा. दुर्दैवाने, काही पक्ष असे असतात की ते पराभव पचवू शकत नाहीत. पराभवाच्या निराशेतून बाहेर या, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी विराेधकांना दिला.
शिंदेसेनेचा कोथळा अमित शाहच काढणार असून दिल्लीतल्या शाहांची ही परंपरा आहे. ज्यापद्धतीने आमच्यासोबत भाजपाने जे केले, त्याचरितीने शिंदेसेनेचे आमदार फोडण्याचं काम व्यवस्थित सुरू आहे. शिंदेसेनेचे ३५ आमदार फुटणार आहेत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. आमचा कोथळा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही त्यातून बाहेर पडलो. असेही त्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis : निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा पद्धतीने तर प्रत्येकवेळी कुणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणुका पुढे जातील. असे आजवर कधीच झाले नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयाेगाला सुनावले.
Shirur MLA Dnyaneshwar Katke : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारने एका 4 वर्षीय मुलीला जाेरदार धडक देऊन उडवल्याने मुलगी गंभीर जखमी झाले असून, तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संघर्ष की रात जितनी अंधेरी होती है, सफलता का सुरज उतना ही तेज चमकता है| सवाल जहर का नहीं था, वो तो मै पी गया, तकलीफ लोगों को तब हुई, जब मैं फिर भी जी गया, अशी शेरोशायरी करत अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी विराेधकांचा समाचार घेतला. मला जे प्रेम दिले ते महायुतीच्या उमेदवारांना प्रेम द्या, असे सांगत निवडून देण्याचे आवाहन केले.
न्यायालयीन अपीलांवरील निकाल २२ नोव्हेंबरनंतर लागल्यामुळे जिल्ह्यातील बारामती, फुरसुंगी उरुळी देवाची, तळेगाव दाभाडे, लोणावळा, दौंड आणि सासवड या सहा नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व नगरपरिषदांसाठीचे मतदान आता २० डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.