PM Modi : महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय यंत्रणा आवश्यक, पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
देशात महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस दलांनी अधिक प्रभावी आणि समन्वयित प्रणाली उभी करणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी डायल 112 प्रमाणे देशभर एकसमान ‘महिला सुरक्षा प्लॅटफॉर्म’ विकसित करण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.











