मुंबई, पुणेसह राज्यात अनेक ठिकाणी एटीएसची छापेमारी, पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील तरुण रडारवर
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई सुरू केली असून राज्यातील विविध शहरांमध्ये एकाचवेळी धाडसत्र राबवण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्या गँगस्टरविरोधात एटीएसने आक्रमक भूमिका घेतली आहे.











