Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Abu Azmi
महाराष्ट्र

Abu Azmi : अबू आझमी यांनी मागितली औरंगजेबाबाबत केलेल्या वक्तव्यावर माफी

राज्यभरातून संताप व्यक्त होत असल्याने समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबाबत केलेल्या एका वक्तव्यावर माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द व संपूर्ण वक्तव्य मागे घेतो, असे ते म्हणाले.

Sambhaji Bhide Guruji
महाराष्ट्र

आरक्षण मागून मराठे स्वतःला संकुचित करून घेत आहेत, संभाजी भिडे गुरुजी यांनी केले मराठ्यांना आवाहन

आरक्षण मागून मराठे सुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. मराठ्यांनी मागायचं नाही. मराठ्यांनी देश चालवायचाय. सबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असणारा समाज जर कुठला असेल, तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले.

The Local Body
महाराष्ट्र

The Local Body : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता पावसाळ्यानंतरच होणार

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता पावसाळ्या नंतरच होणार असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे. दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करु, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत.

Supriya Sule
देश-विदेश

Supriya Sule : ज्याने राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा न ही म्हणत नाहीये, सुप्रिया सुळे यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळांना विचारायचं आहे की, तुम्ही म्हणालात नैतिकतेवर राजीनामा दिला आहे. पण ज्याने राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा न ही म्हणत नाहीये. आम्ही खरं काय समजायचं, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Dhananjay Munde
महाराष्ट्र

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यामागची सांगितली ही कारणे

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करतानाचे फोटो पाहून राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शासन करावे तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी तीव्र झाली होती. त्यांनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्यामागची करणे मुंडे यांनी सांगितली आहेत.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange : याला जबाबदार फक्त धन्या मुंडे, संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला घेण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा

संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला होणार… सगळ्या टोळीचा बिमोड होणार… फोटो भयंकर आहेत. याला जबाबदार फक्त धन्या मुंडे आहे. धन्या मुंडेला पैसे गोड लागले. आतापर्यंत हे लोक मोकाट सोडले होते. कुणाचाही खून करायचे, प्लॉट बळकावयचे, खंडण्या मागायचे, हार्वेटस्टर, कारखानदारांचे पैसे खायचे. मंत्रिपदाचा सगळा वापर गुंडासाठी केला असा इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे.

Dhananjay Munde
महाराष्ट्र

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

संतोष देशमुख हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर 82 दिवसांनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री म्हणाले, धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. मी तो स्वीकारला आहे. पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठविला आहे. धनंजय मुंडे यांना मुक्त करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र

Suresh Dhas संतोष देशमुख यांची हत्या माणुसकीला काळीमा फासणारी, फोटो समोर आल्यावर सुरेश धस यांचा संताप

स्व. सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांची हैवानियत दाखवत संतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर जल्लोष केला.

Aditya Thackeray
महाराष्ट्र

Aditya Thackeray : मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गट गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करेनासा झाला आहे. उलट मुख्यमंत्र्यांचे जास्तीत जास्त कौतुक सुरू आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांची कौतुक करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Tanaji Sawant
महाराष्ट्र

Tanaji Sawant : तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली?

आरोग्य विभागातील टेंडर मधील कथित भ्रष्टाचाराचा आरोप आणि चर्चेत आलेले माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट नाकारण्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्र

धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde  यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

Maharashtra
महाराष्ट्र

Maharashtra : थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पहिल्या पसंतीचे राज्य, विधिमंडळात राज्यपालांचे अभिभाषण

महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीसाठी पहिल्या पसंतीचे राज्य असून सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित राज्य घडवण्यासाठी राज्य शासन काम करत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अभिभाषणात केले.