Manoj Jarange : याला जबाबदार फक्त धन्या मुंडे, संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला घेण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा

Manoj Jarange : याला जबाबदार फक्त धन्या मुंडे, संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला घेण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

बीड : Manoj Jarange संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला होणार… सगळ्या टोळीचा बिमोड होणार… फोटो भयंकर आहेत. याला जबाबदार फक्त धन्या मुंडे आहे. धन्या मुंडेला पैसे गोड लागले. आतापर्यंत हे लोक मोकाट सोडले होते. कुणाचाही खून करायचे, प्लॉट बळकावयचे, खंडण्या मागायचे, हार्वेटस्टर, कारखानदारांचे पैसे खायचे. मंत्रिपदाचा सगळा वापर गुंडासाठी केला असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange )  यांनी दिला आहे.Manoj Jarange

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी 80 व्या दिवशी सीआयडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपींनी संतोष देशमुख यांना अमानूषपणे मारहाण केली आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ आरोपपत्रात जोडले आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात जरांगे-पाटील उपचार सुरू असलेले जरांगे-पाटील रूग्णालयातून थेट मस्साजोग येथे गेले. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे-पाटील यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

मुंडेवर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तरच हे सरकार खानदाणी आहे. तर, त्याला सरकारमधून काढून फेकले पाहिजे. हे फडणवीस आणि अजितदादांना सांगतोय. त्याला 302 मध्ये घ्या. मला पुन्हा-पुन्हा डिवचू नका. तुम्ही हत्या करणारे गुंड पोसत असाल, तर तुम्हालाही भोगावे लागणार,” असा इशारा जरांगे-पाटील यांनी फडणवीस आणि अजित पवार यांना दिला आहे.

जरांगे म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला घेणार आहोत. आरोपी बाहेर आल्यानतंर बदला घेणार. आरोपींनी कसेही बाहेर सुटून यावे… आरोपींना एवढी चीड येईल, असे काही घडले नव्हते. वाद सुरूच असतात. ही पैदास अशीच आहे. यांना पैसा पदे एवढेच लागतात. यांचा बिमोड होणार.आपण कुणाला पाय लावत नाही. पाय लावणारा कितीही जणांची पैदास असली, तरी हा पठ्ठ्या सोडत नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला होणार… सगळ्या टोळीचा बिमोड होणार… फोटो भयंकर आहेत. याला जबाबदार फक्त धन्या मुंडे आहे. धन्या मुंडेला पैसे गोड लागले. आतापर्यंत हे लोक मोकाट सोडले होते. कुणाचाही खून करायचे, प्लॉट बळकावयचे, खंडण्या मागायचे, हार्वेटस्टर, कारखानदारांचे पैसे खायचे. मंत्रिपदाचा सगळा वापर गुंडासाठी केला. इतके निर्दयी तिरस्काराने भरलेले सरकार पाहिले नाही.

Manoj Jarange’s warning to avenge the murder of Dhanya Munde, Santosh Deshmukh is responsible for this

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023