विशेष प्रतिनिधी
महत्वाचे मुद्दे
१. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ATS कडून एकाचवेळी 60 ठिकाणी छापे
२. काही तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न
३. कोण आहे पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी?
पुणे: Pune महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुणे शहर, पुणे ग्रामीण ( Pune) आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी छापेमारी सुरू केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित ‘आयएसआय’ (ISI) संपर्कांच्या अनुषंगाने ६० हून अधिक संशयित व्यक्तींवर एटीएसची नजर असून, त्यांच्या घरांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ‘आयएसआय’कडून शहजाद भट्टीच्या माध्यमातून भारतातील काही तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय ‘एटीएस’ला आहे. त्याच अनुषंगाने या संशयितांची चौकशी आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीही काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागांत ‘एटीएस’ने याच प्रकरणाशी संबंधित छापेमारी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा एटीएसने राज्यभर कारवाईची मोहीम तीव्र केली असून, पुणे जिल्ह्यातील ६० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ‘एटीएस’ पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या ठिकाणी मोठी कारवाई करत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती ‘एटीएस’ने दिली. Pune
‘एटीएस’च्या प्राथमिक तपासानुसार, शहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांशी संपर्क साधण्याचा तसेच त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या संपर्क जाळ्याचा आणि त्यामागील उद्देशाचा शोध एटीएसकडून घेतला जात आहे. तपासाच्या अनुषंगाने आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान चार दिवसापूर्वी देखील महाराष्ट्रात विविध ठिकाणी ‘एटीएस’ने ही कारवाई केली होती. Pune
कोण आहे पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी?
शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असून, दुबईतून डोगर गँग आणि इतर टोळ्यांशी संबंधित नेटवर्क चालवतो. तो सोशल मीडियावर भारतीय तरुणांना सहज ओढून कट्टरतावादी विचारसरणी आणि हेरगिरीकडे नेतो. गेल्या काही महिन्यांत भारतातील दहशतवादी भरती आणि गुप्तहेर प्रकरणांमध्ये त्याचं नाव वारंवार समोर आलं आहे. महाराष्ट्रातही काही तरुण त्याच्याशी संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसने हे नेटवर्क तोडण्यासाठी मोठी कारवाई केली.
शहजाद भट्टीच्या उलटगणती आता सुरू झाली असून, त्याला भारतात पकडण्यासाठी प्रयत्न तीव्र झाले आहेत. पाकिस्तानस्थित सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व शहजाद भट्टी हा दहशतवादाशी संबंधित कारवाया आणि कट्टरतावादी नेटवर्कशी कथित संबंधांमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला आहे. एकेकाळी ऑनलाइन कॉन्टेन्ट निर्मितीच्या माध्यमातून सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या भट्टीवर आता डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून असुरक्षित तरुणांची भरती करण्याचा आणि त्यांना गुन्हेगारी व अतिरेकी नेटवर्कशी जोडण्याचा आरोप आहे.
Sensation in Pune and Pimpri-Chinchwad! ATS conducts rapid, simultaneous raids at 60 locations!
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा