विशेष प्रतिनिधी
मुंबई: एमपीएससी परीक्षांच्या ऑनलाइन पद्धतीच्या निर्णयावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ऑनलाइन परीक्षा सध्यातरी लागू न करण्याबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले. MPSC online exam
यामुळे उद्या निघणारा विद्यार्थ्यांचा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे,.
बैठकीनंतर विद्यार्थी प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी उद्या एमपीएससी अध्यक्ष आणि सचिव यांच्यासोबत चर्चा करून ऑनलाइन परीक्षा लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाईल, असे आश्वासन दिले. भविष्यात ऑनलाइन परीक्षा घ्यायची झाल्यास सर्व स्पर्धा परीक्षा एकाच वेळी ऑनलाइन घेता येईल अशी सक्षम यंत्रणा उभारल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, 17 जुलैपर्यंत भरावयाच्या संयुक्त पूर्व परीक्षा ‘गट क’ अर्जांबाबतही पुनर्विचार केला जाईल, अशी माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सध्यातरी ऑनलाइन परीक्षेचा निर्णय होल्डवर ठेवण्यात आल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले. अधिकाऱ्यांसोबतची बैठक झाल्यानंतर पुन्हा विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा होणार असून, त्यानंतर पुढील भूमिका जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, ही बैठक आयोजित केल्याबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे विद्यार्थी प्रतिनिधींनी आभार मानले. तसेच, आमदार अभिमन्यू पवार, राजेश पांडे आणि राज देशमुख यांनी बैठकीत विद्यार्थ्यांची भूमिका प्रभावीपणे मांडल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
या बैठकीस अक्षय जैन, किरण निंभोरे (वास्तव कट्टा)
शिवराज मोरे (युवक कॉंग्रेस अध्यक्ष), प्रमोद पाटील
लेषपाल जवळगे (सरहद)
अक्षय जैन (युवक कॉंग्रेस)
अनिकेत देशमाने (महाराष्ट्र विद्यार्थी संघटना), नितीन आंधळे (विद्यार्थी प्रतिनिधी)
अर्चना शहा (कॉंग्रेस)
गणेश उबाळे (युवक कॉंग्रेस)
निखिल मगर (विद्यार्थी प्रतिनिधी) हे उपस्थित होते.
MPSC online exam decision put on hold; students’ protest march postponed after CM’s assurance
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा