Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Aditya Thackeray
मुंबई

Aditya Thackeray : पीओके घेणार म्हणणारे बांगलादेशी घुसले कसे ह्याचे उत्तर देऊ शकत नाही, आदित्य ठाकरे यांची टीका

जे प्रत्येक निवडणुकीत सांगतात कि ते पाकव्याप्त काश्मीर (पीओके) घेणार, ते आता बांगलादेशी घुसले कसे ह्याचे उत्तर देऊ शकत नाही. पण प्रत्येक अपयशाचा इव्हेन्ट कसा करायचा, हे ह्या भाजपकडून शिकायचे! जर मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर शिरले असतील, तर त्यांना रोखण्यात, ओळखण्यात आणि देशाबाहेर पाठवण्यात अपयश आले; हे केंद्र व राज्य सरकारने का लपवले? ह्यातून एकच सिद्ध होते की राष्ट्रीय सुरक्षेबाबत केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या कथित भडकावू भाषणांचा तपशील सादर करा, हायकोर्टाचे याचिकाकर्त्याला निर्देश

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासह मनसैनिकांनी हिंदी भाषिकांविरुद्ध केलेल्या कथित द्वेषपूर्ण भाषणांचा तपशील सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना दिले आहेत. भडकावू आणि प्रक्षोभक भाषणांप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात फाैजदारी खटला दाखल करण्याबाबत आदेश देण्याची विनंती करणाऱ्या याचिकेची मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गाैतम अंखड यांच्या खंडपीठानं दखल घेतली आहे.

Shashikant Shinde
महाराष्ट्र

Shashikant Shinde : विलीनीकरणानंतर अजित पवार करणार हाेते राष्ट्रवादीचे नेतृत्व, शशिकांत शिंदे यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणानंतर आम्ही पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवारांकडे सोपवणार होतो, असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केला आहे.

मुंबई

“तटकरे, पटेल व्हिलन कसे?” हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना सवाल

राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल व्हिलन कसे होऊ शकतात? त्यांना का टार्गेट केले जाते?” असा सवाल त्यांनी केला. 

देश-विदेश

बांगलादेशात प्रथमच हिंदू खासदार, गयेश्वर चंद्र राॅय यांनी मिळविला राजधानी ढाक्यातून विजय

बांगलादेशाच्या राष्ट्रीय निवडणुकीत प्रथमच हिंदू उमेदवाराचा विजय झाला असून पहिले हिंदू खासदार हाेण्याचा मान गयेश्वर चंद्र रॉय यांनी मिळविला आहे. 13व्या संसदीय निवडणुकीत ढाका मतदारसंघातून गयेश्वर चंद्र रॉय यांनी विजय मिळविला. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या तिकिटावर निवडणूक लढवत गयेश्वर राॅय यांनी जमात-ए-इस्लामीचे उमेदवार शाहिनुर इस्लामचा पराभव केला.

महाराष्ट्र, मुंबई

संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन”; एसीबी छाप्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, एसीबीने, छापा टाकत एका लिपिकाला लाच घेताना पकडले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना झिरवाळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या भ्रष्टाचाराशी माझा संबंध सिद्ध झाला तर मी राजीनामा देण्यास तयार आहे.”

Latest, देश-विदेश

बांगलादेशच्या १३व्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपी आघाडीवर; दोन-तृतीयांश बहुमताचा दावा

बांगलादेशच्या १३व्या राष्ट्रीय संसदीय निवडणुकीत बांग्लादेश नॅशनॅलिस्ट पार्टी अर्थात बीएनपीने मोठी आघाडी घेतली आहे. २९९ पैकी २०८ मतदारसंघांत आघाडीवर आहे. पक्षाने या निकालाला “जनतेचा प्रचंड कौल” असे संबोधत दोन-तृतीयांश बहुमत मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Tarique Rahman
देश-विदेश

Tarique Rahman : १७ वर्षांच्या वनवासानंतर डार्क प्रिन्स तारिक रहमान पंतप्रधानपदाच्या उंबरठ्यावर

१७ वर्षे परदेशात निर्वासित जीवन जगल्यानंतर तारिक रहमान आता बांगलादेशच्या पंतप्रधानपदाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने राष्ट्रीय निवडणुकीत निर्णायक आघाडी घेत ऐतिहासिक विजयाकडे झेप घेतली आहे. बीएनपी दोन तृतीयांश बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असून रहमान यांनी ढाका-१७ आणि बोगुरा-६ या दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवला आहे. बांगलादेशातील अमेरिकन राजदूतांनी तारिक रहमान आणि बीएनपीचे अभिनंदन करत हा “ऐतिहासिक विजय” असल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांमधील समृद्धी आणि सुरक्षेसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Manoj Jarange
महाराष्ट्र

Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येचा कट, मनोज जरांगे यांचा आरोप

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. त्यासाठी आपल्याच लोकांचा वापर केला जातोय, सुपाऱ्या दिल्या जात आहेत, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे.

Nana Patekar
मुंबई

Nana Patekar : अजित पवारांच्या अपघातासंबधित प्रश्नांचे निराकरण व्हायला हवे, नाना पाटेकर यांची अपेक्षा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातासंबधित प्रश्न उपस्थित केले जात असतील तर त्याचे निराकरण देखील व्हायला हवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेकरांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा घातपात असेल तर ते सिद्ध होईल आणि सिद्ध झाले तर दोषींना शिक्षा मिळेल.

Rohit Pawar
मुंबई

Rohit Pawar : अजितदादा पडले होते एकटे, रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

गेल्या चार महिन्यापासून दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते. देशपातळीवरचे आणि राज्यपातळीवरचे लोक त्यांच्यासोबत नव्हते. मात्र काही मोजके आमदार दादांसोबत होते. आजही तेच आमदार दादांच्या अपघाताबाबत बोलत असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. हा अपघात आहे की घातपात? हाच एक मुद्दा आज महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई

काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये, नवनाथ बन यांचा घणाघात

वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार विसरून काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार स्वाभिमानाने करण्यात आला असून त्यातून देशाचा फायदाच होणार असल्याचेही श्री. बन यांनी नमूद केले.