अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातील लाचखोर राजेंद्र ढेरिंगे याच्या घराची झडती
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात लाच घेणाऱ्या राजेंद्र ढेरिंगे याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याआधी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नाशिक रोड येथील त्याच्या घराची झडती घेतली. या झडतीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कागदपत्रांमधून आणखी माहिती उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











