Shrikant Shinde : खुमखुमी असेल माझ्याविरोधात उभे राहा, श्रीकांत शिंदे यांचे गणेश नाईकांना आव्हान

विशेष प्रतिनिधी

ठाणे: Shrikant Shinde तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या नादी लागा, पण माझ्या नादी लागू नका. जास्तच खुमखुमी असेल तर कल्याण किंवा ठाण्यातून माझ्याविरोधात खासदारकीला उभे राहा, असे खुले आव्हान शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांना दिले आहे. गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे आणि नाईक यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे.Shrikant Shinde

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्यात वाद सुरू झाला आहे. वयावरून टीका करणाऱ्या श्रीकांत शिंदे यांना गणेश नाईक यांनी माझ्या नादाला लागलात तर माजी खासदार करून टाकेन, असा इशारा दिला होता.Shrikant Shinde



यावर पलटवार करताना श्रीकांत शिंदे म्हणाले, वयाच्या हिशोबाने आजार होत असतात. यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड, दिशाभूल असे आजार होत असतात. हे मी सांगू शकतो कारण मी डॉक्टर आहे. मला माजी खासदार करण्याचे वक्तव्य त्यांनी करू नये. जर जास्तच खुमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून, कुठूनही त्यांनी किंवा त्यांच्या मुलाने निवडणूक लढवून दाखवावी. मी त्यांच्यासमोर उभा राहील. लोकांनी मला तीन वेळ निवडून दिले आहे. तुम्ही शिंदे साहेबांच्या नादी लागा, मात्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नादी लागू नका.

“If You Have the Guts, Contest Against Me”: Shrikant Shinde Challenges Ganesh Naik

महत्वाच्या बातम्या