ही तर जिहादी मानसिकता, नीतेश राणेंची सपकाळांवर जोरदार टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्या शौर्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या विधानावर मंत्री नीतेश राणे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सपकाळांवर हल्लाबोल केला आहे. Nitesh Rane

नीतेश राणे म्हणाले की, टिपू सुलतान यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणे अयोग्य असून अशा प्रकारची वक्तव्ये जिहादी मानसिकता आहेत. आरोप केला की, इतिहासातील काही घटनांवरून टिपू सुलतान यांच्यावर मंदिर विध्वंस आणि धर्मांतराच्या आरोपांचा उल्लेख केला जातो. “अशा व्यक्तीची शिवरायांशी तुलना होऊच शकत नाही.

राणे म्हणाले की, टिप्या ची बरोबरी शिवरायांशी करणे यालाच जिहादी मानसिकता बोलतात.. ज्या टिप्याने लाखो हिंदूचे धर्मांतर केले.. मंदिर तोडली.. फक्त इस्लाम वाढवण्यात लक्ष दिले..तो आमच्या शिवरायांच्या जवळ पास पण येऊ शकत नाही ! काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काडून टिप्या चे लाऊन दाखवावे मग बघु शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ! हर हर महादेव !

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे. “सपकाळ कोणत्या शाळेत इतिहास शिकले, याचाही अभ्यास करावा लागेल. महाराष्ट्र असा नव्या प्रकारचा इतिहास स्वीकारणार नाही,” असे फडणवीस म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ यांनी यापूर्वी वक्तव्य करताना सांगितले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याप्रमाणेच टिपू सुलतान यांनीही इंग्रजांविरोधात लढा दिला आणि त्या अर्थाने त्यांना शौर्यवान योद्धा म्हणून पाहिले जावे.

या पार्श्वभूमीवर टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज यांच्या तुलनेवरून सुरू झालेला वाद आता अधिक तीव्र झाला असून, राजकीय आरोप–प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे.

“This Is Jihadi Mindset”: Nitesh Rane Launches Sharp Attack on Sapkal Over Tipu Remark

महत्वाच्या बातम्या