व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का नाही? राेहित पवार यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करणारे आरोप सुरूच ठेवले आहेत. व्हीएसआर या विमान कंपनीवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल राेहित पवार यांनी केला आहे. VSR Airlines

राेहित पवार यांनी साेशल मीडियावर केलेल्या पाेस्टमध्ये विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करताना विमान कंपनीवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केले जाते. चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फे केले जाते. मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही? हे न उमजणारे कोडे आहे.

कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं? असा सवाल करून राेहित पवार यांनी म्हटले आहे की, देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या VSR कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, तातडीने या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी.



अहमदाबाद विमान अपघाताबाबत माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताचा हवाला देऊन त्यांनी म्हटले आहे की, अहमदाबाद विमान अपघातातात पायलटनेच फ्यूल स्विच बंद केल्याची बातमी बघता, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत व्यक्त केलेला संशय अधिक बळावला. बारामती अपघाताबाबत देखील यादृष्टीने तपास होऊन पायलटवर कोणाचा दबाव होता का ? याबाबत कसून सखोल आणि निष्पक्ष तपास झालाच पाहिजे. कधी-कधी चालकाला ठार मारणेच पुरेसे असते असे नमूद करत पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवरही संशय व्यक्त केला आहे.

अजित पवार यांचे गेल्या 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झाले. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी बाकावरील अनेक पक्षांच्या नेत्यांनी या अपघाताविषयी संशय व्यक्त केला आहे. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी मुंबई व दिल्लीत विस्तृत पत्रकार परिषदा घेऊन अजित पवारांच्या शेवटच्या काही तासांतील घटनाक्रमावर संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, या विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीच्या वडीलांनीही विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला. केवळ पायलटच नव्हे तर विमानही बदलले, असा दावा त्यांनी केला. पहाटे सहा वाजता मुंबईत वाहतूक काेंडी असते काेठे? असा सवाल करत त्यांनी पायलट का बदलला असा प्रश्न केला आहे.

Why is there no action against VSR Airlines yet? Rohit Pawar questions

महत्वाच्या बातम्या