Tipu Sultan : टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना करणे भोवले, हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

पुणे : Tipu Sultan काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान हे समकक्षच आहेत असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार होत आहे . सपकाळ यांच्यावर भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे येथील पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Tipu Sultan

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान सपकाळ यांनी केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.Tipu Sultan



मालेगावात महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद निर्माण झालेला असतानाच, त्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाने आणखी वाद निर्माण झाला आहे. सपकाळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य ज्याप्रकारचे आहे, त्यांनी जो स्वराज्या विचार दिला, त्याच मां: दियाळीत, त्यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्याविरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपूत्र होऊन गेले, त्यांनी कधीही कोणत्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांच्याकडे शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.

Harshvardhan Sapkal Booked After Comparing Tipu Sultan to Shivaji Maharaj

महत्वाच्या बातम्या