पुण्यात काँग्रेस भवनासमोर भाजप – काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर, आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेक

विशेष प्रतिनिधी

पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने काँग्रेस भवनासमोर केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यात काँग्रेसचे 2 कार्यकर्ते जखमी झाले.

काँग्रेस कार्यालयात घुसण्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी प्रयत्न केला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाच्या बाहेर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आंदोलनावेळी दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप काँग्रेसने केलाअसून यामध्ये काही कारच्या काचा फुटल्या, तसेच गाड्यांच ं
काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांला दगड लागल्याने तो रक्तबंबाळ झाला.

भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘काँग्रेसकडून आधी दगडफेक करण्यात आली. काँग्रेसचे काँग्रेसचे लोक आक्रमक होऊन आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करत होते. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, असा आरोप भाजपने केला.

आजचा दिवस हा एकदम वाईट दिवस आहे, कारण पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला”, असा आरोप प्रशांत जगताप यांनी केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

आंदोलनाच्या कालमर्यादेवरून काँग्रेसनं पोलिसांवर आक्षेप घेतला आहे. त्यानुसार, पुण्यात काँग्रेस युवा मोर्चाकडून अनेकदा आंदोलन करण्यात आली. मात्र पाच ते दहा मिनिटांच्या आतमध्ये पोलीस आमचे आंदोलन गुंडाळतात. आम्हाला पोलिसांकडून ताब्यात घेतलं जातं. मात्र भाजपचे कार्यकर्ते मागील एका तासापासून आंदोलन करत आहेत, त्यांना अद्याप अडवलेलं नाही, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांवर केला आहे.

BJP–Congress Workers Clash Outside Congress Bhavan in Pune; Protest Turns Violent, Stones

महत्वाच्या बातम्या