विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या दाेन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षातील सर्व आमदारांची मुंबईत बैठक घेणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मते जाणून घेणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांन दिली.Sunetra Pawar
सुनेत्रा पवार मंगळवारी आमदारांशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक आमदारांनी वन टू वन चर्चा करत विलीनीकरणावर त्यांची मते जाणून घेतील. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमदारांची मते विचारात घेतली पाहिजेत असे अनेक नेत्यांनी मांडलेल्या प्रतिक्रियेनंतर हे पाऊल उचलण्यात येत आहे. Sunetra Pawar
नेतृत्वाने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करावी आणि त्यांना विश्वासात घेऊन पुढील वाटचाल करावी. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्व आमदारांची बैठक बोलावली पाहिजे. हा निर्णय सामूहिकपणे घेतला पाहिजे. आम्ही नेतृत्वाकडे मत मांडू, अशी अपेक्षा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केली हाेती. Sunetra Pawar
पक्षातील ४० पैकी ३५ आमदार हे विलीनीकरणाच्या बाजूने आहेत. आम्हालाही दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण हवे. तीच अजितदादांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल. मी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करताना माझे मत मांडले आहे, असे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार होत्या. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठकांचा सिलसिला सुरू होता. अजित पवार विलिनीकरणाबाबत आग्रही होते. परंतु त्यांच्या अचानक निधनाने या चर्चा थांबल्या असं राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते बोलत आहेत.
दुसऱ्या बाजुला शरद पवार गटाने आता विलीनकरणाची चर्चा थांबविल्याचे संकेत मिळत आहेत. यापुढे पक्षांतर्गत विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. कुठलाही नेता या विषयावर जाहीरपणे बोलणार नाही, असे राष्ट्रवादी काॅंग्रस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या तात्काळ चर्चेला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नकार दिला आहे. याचा सर्वस्वी निर्णय सुनेत्रा पवार यांच्यावर अवलंबून असेल. प्राधान्याने पक्ष सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मजबूत करणे आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणे यादृष्टीने काम करत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्यानंतरच विलीनीकरणाचा मुद्दा हाती घेतला जाईल आणि निर्णय त्या घेतील असं भुजबळांनी स्पष्ट केले. Sunetra Pawar
Sunetra Pawar will know the opinions of MLAs regarding the merger of NCP
महत्वाच्या बातम्या
- व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का नाही? राेहित पवार यांचा सवाल
- Shashikant Shinde : विलीनीकरणानंतर अजित पवार करणार हाेते राष्ट्रवादीचे नेतृत्व, शशिकांत शिंदे यांचा दावा
- “तटकरे, पटेल व्हिलन कसे?” हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना सवाल
- संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन”; एसीबी छाप्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया