अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातील लाचखोर राजेंद्र ढेरिंगे याच्या घराची झडती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात लाच घेणाऱ्या राजेंद्र ढेरिंगे याला सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याआधी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नाशिक रोड येथील त्याच्या घराची झडती घेतली. या झडतीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कागदपत्रांमधून आणखी माहिती उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Raid

लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात लाच घेताना रंगेहात पकडल्याने या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत आले आहेत. मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात कार्यरत कर्मचारी लाच घेताना सापडल्याने विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. Raid



राजेंद्र ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून सुमारे वर्षभरापूर्वी तो अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. प्रतिनियुक्तीवर आलेल्या कर्मचाऱ्याच्या कामकाजाची जबाबदारी आणि देखरेख यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. झडतीदरम्यान मिळालेली कागदपत्रे तपासासाठी महत्त्वाची ठरू शकतात. ही कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली जाऊ शकतात आणि त्यानंतर एसीबीकडून अधिक तपशील मांडला जाईल, अशी शक्यता आहे. Raid

ढेरिंगेच्या लाचखोरीचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. एसीबीचे अधिकारी न्यायालयात कोणती माहिती मांडतात आणि त्यातून आणखी काही स्फोटक तपशील पुढे येतात का, याबाबत उत्सुकता आहे. या प्रकरणामुळे मंत्रालयातील कामकाजावर आणि संबंधित विभागाच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याची चर्चा सुरू आहे. चौकशीचा विस्तार वाढल्यास आणखी अधिकारी किंवा कर्मचारी तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. Raid

Raid at Food and Drug Administration clerk Rajendra Dheringe’s Home in Bribery Case

महत्वाच्या बातम्या