विशेष प्रतिनिधी
भोपाळ: Mohan Yadav हेलिकॉप्टर प्रवासातील धोका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी अनुभवला. त्यांचे हेलिकॉप्टर हवेत डगमगू लागले होते. पायलटने प्रसंगावधान राखून हेलिकॉप्टर खाली आणून स्थिर केले आणि नंतर सुरक्षित उड्डाण केले. मात्र यावेळी प्रचंड प्रमाणात धूळ उडाल्याने उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकण्याची वेळ आली होती.Mohan Yadav
डॉ. मोहन यादव खंडवा येथील पंधाना येथे राज्यस्तरीय लाडली बहना योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर टेकऑफसाठी हवेत वर आले, तेव्हा ते पुढे जाण्याऐवजी मागे सरकू लागले. नंतर काही क्षणांसाठी हवेत थांबले. पायलटने प्रसंगावधान राखत तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आणि हेलिकॉप्टरने सुरक्षित उड्डाण केले. यानंतर मुख्यमंत्री यादव खंडवा येथून भोपाळला पोहोचले. या घटनेचा व्हिडिओ रविवारी समोर आला आहे.Mohan Yadav
खंडवाचे पोलीस अधीक्षक (एसपी,) मनोज कुमार राय म्हणाले- तांत्रिकदृष्ट्या असे काहीही नव्हते ज्यामुळे उड्डाणात कोणतीही अडचण आली असती. आम्ही तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यांनी सांगितले की, ही सामान्य बाब आहे. टेक ऑफच्या वेळी हेलिकॉप्टर वेगळ्या दिशेने होते, तर त्याला दुसऱ्या दिशेने जायचे होते.
तो हवेत वर येऊन ठरलेल्या दिशेने जाण्यासाठी फिरू लागला. याच दरम्यान जास्त धूळ उडू लागली. धूळ आणखी उडू नये म्हणून पायलटनी हेलिकॉप्टरचा वेग कमी केला. मग काही सेकंदातच हेलिकॉप्टरला थोडे खाली आणून स्थिर केले. यानंतर हेलिकॉप्टर भोपाळसाठी रवाना झाले.
Heart-Stopping Moment: Helicopter Carrying Dr. Mohan Yadav Averts Mishap, Pilot’s Swift Action Saves the Day
महत्वाच्या बातम्या
- ही तर जिहादी मानसिकता, नीतेश राणेंची सपकाळांवर जोरदार टीका
- पुण्यात काँग्रेस भवनासमोर भाजप – काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर, आंदोलनाला हिंसक वळण, दगडफेक
- Tipu Sultan : टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना करणे भोवले, हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल
- Rahul Narwekar : त्या घटनेशी माझा काय संबंध? राहुल नार्वेकर यांचे संजय राऊत यांना उत्तर