विशेष प्रतिनिधी
परळी: Dhananjay Munde देवाभाऊ म्हणजे कामधेनू आहेत, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहित आहेत. इच्छा माहित असल्याने जास्त बोलू नको असा निरोप दिला असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. त्यामुळे मुंडे यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होण्याची चर्चा सुरू झाली आहे.Dhananjay Munde
बीड जिल्ह्यातील परळी येथे महापशुधन एक्सपोच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी परळीमध्ये आले होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री यांच्यासह पंकजा मुंडे व धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळ भाषण करताना धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख कामधेनू असा केला.Dhananjay Munde
धनंजय मुंडे त्यांच्या भाषणाच्या शेवटी बोलताना म्हणाले, मी त्यांना आधीच कामधेनू म्हटले आहे, म्हणजे आमच्या मनातल्या इच्छा तुम्हाला माहित आहेत. म्हणून जास्त बोलू नको असा त्यांचा निरोप आला. त्यांनी आतापर्यंत आपल्याला जे दिले त्याबद्दल त्यांचे आभार. आमच्या मनातल्या इच्छा तुम्हाला माहित आहेत. त्यानंतर भाषण संपल्यावर बसत असताना देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या डोक्यात टपली मारली.
देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळात समावेश झालेले धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता पुन्हा एकदा त्यांचा समावेश होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
Dhananjay Munde Calls Devabhau a ‘Kamdhenu’, Says He Knows Our Heart’s Wishes
महत्वाच्या बातम्या
- व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का नाही? राेहित पवार यांचा सवाल
- Shashikant Shinde : विलीनीकरणानंतर अजित पवार करणार हाेते राष्ट्रवादीचे नेतृत्व, शशिकांत शिंदे यांचा दावा
- “तटकरे, पटेल व्हिलन कसे?” हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना सवाल
- संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन”; एसीबी छाप्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया