Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Himanta Biswa Sarma
देश-विदेश

Himanta Biswa Sarma : हिमंत बिस्वा सरमा म्हणाले…सोनिया गांधी मुख्यमंत्री करायला तयार होत्या पण बरे झाले झालो नाही!

2014 मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की मी शपथविधीची तारीख ठरवावी. त्यावेळी काँग्रेसचे 58 आमदार माझ्या पाठीशी होते. पण बरे झालो मुख्यमंत्री झालो नाही, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.

President Sapkal
मुंबई

President Sapkal : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी अखेर मागितली माफी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेल्या तुलनेविषयी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. दिलगिरी व्यक्त करतो. कुणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे.

Mantralaya Clerk
मुंबई

Mantralaya Clerk : मंत्रालयातील अटक क्लार्कला देता येईना 43 हजारांचा हिशोब

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील राजेंद्र ढेरंगे या क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी 12 फेब्रुवारी रंगेहाथ अटक केली. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. ढेरंगे याला अटक केल्यानंतर त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

RSS Chief
देश-विदेश

RSS Chief : मुस्लिमही हिंदू. त्यांचीही घरवापसी , हिंदुनी जन्माला घालावीत तीन मुले, सरसंघचालकांचे आवाहन

भारतात राहणारे मुस्लिमही हिंदूच आहेत, ते काही अरबमधून आलेले नाहीत. त्यांचीही घरवापसी करायची आहे. पण हे काम हळूहळू होईल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यामुळे नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

विश्लेषण

अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील नाेंदणी साधनांचे आगीमुळे नुकसान, तपास यंत्रणेकडून प्रथमच अधिकृत माहिती

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. विमान अपघात तपास यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दुर्घटनेनंतर विमानातील दोन्ही नोंदणी साधनांवर तीव्र आगीचा परिणाम झाल्याने तपासात अडचणी असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र

लाचखोरीचे प्रकरण अतिशय दयनिय व कलंक लावणारे, नरहरी झिरवाळ यांचे खातेनिहाय चौकशीचे आदेश

लाचखोरीचे प्रकरण अतिशय दयनिय व कलंक लावणारे आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण आम्हीही त्याच्या चौकशीसाठी एक खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. सहआयुक्त दक्षता व पोलिस उपायुक्तांच्या माध्यमातून ही चौकशी होईल. या चौकशीचा गोपनीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे

खारगे समितीची पार्थ पवार यांना क्लिन चिट, राज्यसभेवर जाण्याचा मार्ग माेकळा

पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी चाैकशीसाठी नेमलेल्या खारगे समितीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना क्लिन चिट दिली आहे. यामुळे राज्यसभेवर जाण्याचा पार्थ पवार यांचा मार्ग माेकळा झाल्याचे बाेलले जात आहे.

Chief Minister
मुंबई

Chief Minister : शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली असताना आणि शासकीय दुखवटा असताना अल्पसंख्यांक विभागात घाईगडबडीत 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यात आला. याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.

Harshvardhan Sapkal
महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरर होणाऱ्या टीकेवर उत्तर देण्यासाठी आता सपकाळ यांची मुलगी गार्गी मैदानात

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने त्यांच्यावर संताप व्यक्त होत आहे. त्यांची जीभ कापण्याचीही धमकी दिली जात आहे. वडिलांवर होणाऱ्या टीकेवर उत्तर देण्यासाठी आता सपकाळ यांची मुलगी गार्गी सपकाळ मैदानात उतरल्या आहेत.

Devedra Fadanvis
महाराष्ट्र

Devedra Fadanvis : थकीत कर्जदार शेतकऱ्यांची शासनाने मागवली सविस्तर माहिती, कर्जमाफीची शेतकऱ्यांना आशा

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून राज्यातील सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाच्या शिंदे समितीकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Amol Mitkari,
मुंबई

Amol Mitkari, : अजितदादांच्या विमानाचे दोन पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले होते? सीसीटीव्ही समोर आणण्याची मागणी

अजितदादांच्या विमानाचे दोन पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले होते, ते घरातून कधी निघाले होते याचा सीसीटीव्ही महाराष्ट्राच्या समोर आणा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केली आहे.

Latest

टिपू सुलतानचा पुळका आला असेल तर तुमच्या बायका पाेरांची नावे त्याच्या नावाने ठेवा, गाेपीचंद पडळकर यांचा संताप

काँग्रेसमध्य सर्व जण ही शिवरायांच्या विचारांच्या उलट वागणारी लोकं आहेत. या लोकांना जोड्याने मारण्याची गरज आहे. टिपू सुलतानचा जास्त पुळका आला असेल तर तुमच्या बायका पाेरांची नावे त्याच्या नावाने ठेवा, असा संताप भारतीय जनता पक्षाचे आमदार गाेपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.