विशेष प्रतिनिधी
मुंबई : Amol Mitkari, अजितदादांच्या विमानाचे दोन पायलट कुठे ट्रॅफिकमध्ये अडकले होते, ते घरातून कधी निघाले होते याचा सीसीटीव्ही महाराष्ट्राच्या समोर आणा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केली आहे.Amol Mitkari,
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यांचा अपघात होता की घातपात यावरून अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.Amol Mitkari,
अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटले, ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण! आता ब्लॅक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार व ‘लवकरच’ विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजतो. आम्ही वाट पाहू पण तोवर विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कुण्या गाडीत निघाले, कुण्या रोडवर ट्रॅफिकमध्ये अडकले, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व सर्व या पायलटचा 28 जानेवारी 2026 चा दिनांक व दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा ही विनंती, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सध्या रोहित पवार दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. विमान अपघातामागील खरे कारण शोधण्यासाठी ते हवाई क्षेत्रात वैमानिक किंवा इतर पदांवर काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. तज्ज्ञांकडून माहिती गोळा करून अपघाताची शक्यता, तांत्रिक बाबी आणि नियमांचे पालन झाले होते का, याचा अभ्यास ते करत आहेत. अपघाताच्या चौकशीचा अधिकृत अहवाल येण्यास विलंब होत असल्याने त्यांनी स्वतंत्र पातळीवर माहिती संकलन सुरू केले आहे.
तसेच अपघाताचा अधिकृत चौकशी अहवाल यायला अजून वेळ लागू शकतो, असे संबंधित अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र हा अहवाल लवकर मिळावा आणि अपघातामागील सत्य स्पष्ट व्हावे, यासाठी रोहित पवार यांनी खासगी गुप्तहेरांची मदत घेतल्याची माहिती समोर येत आहे.
Where Were Ajit Dada’s Two Pilots Stuck in Traffic? Demand to Make CCTV Footage Public
महत्वाच्या बातम्या
- व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का नाही? राेहित पवार यांचा सवाल
- Shashikant Shinde : विलीनीकरणानंतर अजित पवार करणार हाेते राष्ट्रवादीचे नेतृत्व, शशिकांत शिंदे यांचा दावा
- “तटकरे, पटेल व्हिलन कसे?” हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना सवाल
- संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन”; एसीबी छाप्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया