लाचखोरीचे प्रकरण अतिशय दयनिय व कलंक लावणारे, नरहरी झिरवाळ यांचे खातेनिहाय चौकशीचे आदेश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लाचखोरीचे प्रकरण अतिशय दयनिय व कलंक लावणारे आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण आम्हीही त्याच्या चौकशीसाठी एक खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिलेत. सहआयुक्त दक्षता व पोलिस उपायुक्तांच्या माध्यमातून ही चौकशी होईल. या चौकशीचा गोपनीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. Narhari Zirwal

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अन्न व औषधी प्रशासन खात्यातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्याने 50 हजार रुपयांपैकी 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. सध्या हा लिपिक पोलिसांच्या कोठडीत आहे. थेट मंत्रालयातच लाचखोरीचा हा प्रकार घडल्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. विरोधकांनी या प्रकरणी नरहरी झिरवाळ यांना धारेवर धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर झिरवाळ यांनी या प्रकरणाशी आपला संबंध आढळला तर आपण स्वतःहून राजीनामा देऊ असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर झिरवाळ आज बोलतानाआपली बाजू स्पष्ट केली. Narhari Zirwal



नरहरी झिरवाळ म्हणाले, 12 तारखेला जी काही धाड पडली, तिथे राजेंद्र ढेरिंगे नामक क्लार्क रंगेहाथ पकडला गेला. खात्यात असा प्रकार सुरू होता मला त्याची सूतराम कल्पना नव्हती. ऑफिस व माझे कार्यालय हे जवळ असले तरी, ओएसडींच्या जवळ जाऊन त्यांचे काम पाहण्याचा प्रसंग अद्याप आला नाही. परंतु जे झाले अतिशय दयनिय व कलंक लावणारे वर्तन आहे. ढेरिंगे सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडलेत. त्यांची चौकशी सुरू आहे. पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून सहआयुक्त दक्षता व पोलिस उपायुक्त यांच्या मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेत. त्या पद्धतीने त्यांची चौकशी सुरू आहे. त्याचा गोपनीय अहवाल माझ्याकडे सादर केला जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.Narhari Zirwal

सदर अधिकारी आपल्याकडे उसनवारी तत्वावर होते. अन्नपुरवठा विभागाचे होते. आपण तत्काळ सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहून त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना मू्ळ आस्थापनात वर्ग करण्याची विनंती केली. त्यावर कारवाई सुरू आहे. माझ्याकडे एखादी फाईल आणून त्यावर बळजबरीने स्वाक्षरी करवून घेण्याचे प्रकरण अद्याप घडले नाही. त्याची एक प्रक्रिया असते. त्यावर सुनावणी घ्यावी लागते. त्यानंतर त्याला स्थगिती देणे किंवा निलंबित करणे अथवा योग्य त्या पूर्तता करून दिलासा दिला जातो. या प्रकरणी बळजबरी करण्याचा प्रकार नसतो. माझ्या ओएसडींचा या प्रकरणाशी संबंध नाही. यासंबंधीच्या बातम्यात सत्यता नाही. क्लार्क ढेरिंगे यांनीही तसा दावा केला नाही. त्यांनी स्वतःसाठीच हे पैसे घेतल्याचा जबाब दिला आहे. Narhari Zirwal

Bribery Case Deeply Shameful and Disgraceful, Narhari Zirwal Orders Department-Wise Probe

महत्वाच्या बातम्या