शिवजयंतीनिमित्त महसूल विभागाची मोठी घोषणा; एका दिवसात १५ महसूल सेवा निकाली काढणार
शिवजयंतीच्या महापर्वाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल विभागाकडून महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ जाहीर करत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या १५ महत्त्वाच्या सेवा एका दिवसात उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला.











