विशेष प्रतिनिधी
पुणे; महाराष्ट्रातील शिवरायांचे सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आता अतिक्रमणमुक्त झाले आहेत. एकाही किल्ल्यावर आता अतिक्रमण नाही. हा निर्णय अजितदादांच्या इच्छेनुसार पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Forts of Shivaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जन्मोत्सवानिमित्त किल्ले शिवनेरी येथे भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास आणि भूगोल यांचे चित्र वेगळे असते. ज्या काळात अनेक राजे मोघलांच्या अधिपत्याखाली काम करत होते, त्या काळात आई जिजाऊंनी शिवरायांना घडवले. त्यांनी शिवरायांना हिंदुस्थानाला मोघलांच्या जोखडातून मुक्त करण्याची आणि रयतेचे राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली. अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून उभी केलेली फौज ही स्वराज्याची ताकद ठरली. शिवरायांनी हे राज्य माझे नसून रयतेचे आहे, असे सांगत देव, देश आणि धर्मासाठी लढण्याची शिकवण दिली. Forts of Shivaji Maharaj
समुद्रमार्गे शत्रू येऊ शकतो, हे ओळखणारे शिवाजी महाराज हे पहिले राजे होते. त्यामुळे पश्चिम किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी जलदुर्ग उभारण्याचे काम त्यांनी हाती घेतले. पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत कोणत्याही आक्रमकाला समुद्रमार्गे येण्याची हिंमत झाली नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. शिवरायांचे हे नियोजन आणि धाडस आजही प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामनिर्देशित करण्यात आले असून जगातील 27 देशांनी त्यास एकमताने मान्यता दिली, याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. हा सन्मान केवळ महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण देशाचा गौरव आहे, असे ते म्हणाले. शिवरायांचा वारसा जगासमोर नेण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Forts of Shivaji Maharaj
अजितदादांना शिवनेरी किल्ल्याबद्दल प्रचंड प्रेम होते. काही काळापूर्वी महाराष्ट्रातील शिवरायांचे सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आता अतिक्रमणमुक्त झाले आहेत, असे त्यांनी जाहीर केले. एकाही किल्ल्यावर आता अतिक्रमण नाही, असे सांगताना त्यांनी समाधान व्यक्त केले. हा निर्णय अजितदादांच्या इच्छेनुसार पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. Forts of Shivaji Maharaj
2030 साली छत्रपती शिवाजी महाराजांची 400 वी जयंती भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्या निमित्ताने राज्यभर विविध उपक्रम राबवले जातील, अशी घोषणा त्यांनी केली. Forts of Shivaji Maharaj
All Forts of Shivaji Maharaj to Be Freed from Encroachments; CM Says Ajit Dada’s Wish Fulfilled
महत्वाच्या बातम्या
- स्वीकृत सदस्य म्हणजे काय? महानगरपालिका स्वीकृत सदस्यांची निवड कशी केली जाते?
- अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील नाेंदणी साधनांचे आगीमुळे नुकसान, तपास यंत्रणेकडून प्रथमच अधिकृत माहिती
- खारगे समितीची पार्थ पवार यांना क्लिन चिट, राज्यसभेवर जाण्याचा मार्ग माेकळा
- Chief Minister : शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती