Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका
मुंबई मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अॅड. एजाझ नक्वी यांनी ही याचिका दाखल केली असून, त्याद्वारे शासनाचा संबंधित निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांमधील मुस्लिम समाजाला दिलेले 5 टक्के आरक्षण अचानक रद्द करण्यामागे नेमके काय कारण आहे? असा रोखठोक सवाल या याचिकेतून उपस्थित करण्यात आला असून, सरकारच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.











