अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखाेरी, नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर कडक कारवाई

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखाेरीप्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपले खासगी सचिव रामदास गाडे यांच्यावर कडक कारवाई केली आहे. त्यांनी रामदास गाडे यांना अन्न व औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करत पुन्हा मूळ आस्थापनेत पाठवण्याचे आदेश दिलेत.Narhari Jirwal

अन्न व औषधी प्रशासन खात्यातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्याने 50 हजार रुपयांपैकी 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. सध्या हा लिपिक पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याने झिरवाळ यांचे स्वीय सहाय्यक रामदास गाडे याचे नाव घेतल्याची माहिती आहे.. विरोधकांनी या प्रकरणी नरहरी झिरवाळ यांना धारेवर धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर झिरवाळ यांनी या प्रकरणाशी आपला संबंध आढळला तर आपण स्वतःहून राजीनामा देऊ असे स्पष्ट केले होते.Narhari Jirwal



झिरवाळ यांनी आपले खाजगी सचिव डॉक्टर रामदास गाडे यांना तातडीने पदावरून कार्यमुक्त केले आहे. गाडे हे झिरवाळ यांच्या मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर होते. पण आता त्यांची सेवा त्यांच्या मूळ विभागात (कृषि विभाग) वर्ग करण्यात आली आहे. झिरवाळ यांनी या प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाला तातडीने आदेश काढण्याचे निर्देश दिले आहेत. Narhari Jirwal

लाचखोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नरहरी झिरवाळ यांच्या खात्याच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. स्वतःची व पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घ्या. विशेषतः प्रशासन व अधिकारी बदनाम होणार नाही याचीही खबरदारी घ्या, असे खडे बोल सुनेत्रा अजित पवार यांनी सुनावले होते.Narhari Jirwal

माझ्या विभागातील क्लार्क लाचखोरीच्या प्रकरणात सापडला ही माझीही जबाबदारी आहे. ही जबाबदारी माझी नाही असे बोलून चालणार नाही. त्याने जे कृत्य केले आहे, त्या कृत्याला मी पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्या चौकशीत या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत आले तर मी स्वतःहून 100 टक्के मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे झिरवाळ म्हणाले हाेते. Narhari Jirwal

Strict action against Ramdas Gade, private secretary of Narhari Jirwal, for bribery in the Food and Drug Administration Department

महत्वाच्या बातम्या