Congress चंद्रपूरचा बदला भिवंडीत पण कार्यकर्त्यांना डावलून घेतल्याने काॅंग्रेसवर टीकेचे माेहाेळ

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांची निवड झाली आहे. या आज झालेल्या निवडणुकीत चौधरी यांना स्पष्ट बहुमत मिळाले. त्यांच्या निवडीमुळे भाजपला जोरदार झटका बसला असून, काँग्रेसने ‘चंद्रपूर’चा बदला घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असली तरी सर्वात माेठा पक्ष बनूनही महापाैरपद मिळाले नाही. त्यामुळे काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. Congress

भाजपने सुरुवातीला भिवंडीच्या महापौरपदासाठी नारायण चौधरी यांचे नाव निश्चित केले होते. पण त्यानंतर अचानक स्नेहा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. भाजपच्या या निर्णयामुळे नारायण चौधरी व त्यांचे सहकारी नगरसेवक नाराज झाले होते. चौधरी उघड नाराजी व्यक्त करत आपल्या 8 समर्थक नगरसेवकांपासून काँग्रेसला जाऊन मिळाले. त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना नारायण चौधरींच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आज दुपारी झालेल्या निवडणुकीत चौधरी यांना 48 मते मिळाली. Congress



स्व. विलासरावजी देशमुख सभागृहात दुपारी 12 वाजता निवडणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर हात वर करून झालेल्या मतदानात नारायण चौधरी यांना 48 मते मिळाली. यात काँग्रेसच्या 30, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 12 नगरसेवकांचा समावेश आहे. महापौरपदासाठी एकूण 10 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. त्यात चौधरी यांचे 2 अर्ज होते. सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. त्यात कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास पाटील पोलिस एस्कॉर्टने येत असल्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी झाली. पण पिठासीन अधिकाऱ्यांनी प्रक्रिया थांबवण्यास नकार दिला. अखेरीस 6 उमेदवारांनी माघार घेतली आणि स्नेहा पाटील (भाजप), नारायण चौधरी (सेक्युलर फ्रंट समर्थित) आणि विलास पाटील (शिंदे गट) अशी तिरंगी लढत झाली.
त्यात नारायण चौधरी यांना 48, तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना अवघी 16 मते पडली. शिंदे गटाच्या विलास पाटलांना 25 मतांवर समाधान मानावे लागले. Congress

मात्र, यामुळे काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. सर्वात माेठा पक्ष ठरलेल्या काॅंग्रेसने स्वत:च्या कार्यकर्त्याला माेठे करण्याएवजी भाजपच्या कार्यकर्त्यालाच महापाैरपदी संधी दिली अशी टीका हाेत आहे.Congress

Chandrapur’s revenge in Bhiwandi but Congress faces criticism for ignoring workers

महत्वाच्या बातम्या