Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Tanker Chaos
मुंबई

Tanker Chaos : टँकर उलटल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांना मिळणार टोलचा परतावा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांना त्यांच्या फास्टॅगमध्ये टोल परतावा दिला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.

CM
मुंबई

CM : अजित पवार विमान अपघातातील 13 निर्धारित मुद्यांवर चौकशी सुरू, मुख्यमंत्र्यांची माहिती

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता. विमान अपघातावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. 13 निर्धारित मुद्यांवर सध्या चौकशी सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

FASTag
देश-विदेश

FASTag : आता फास्ट टॅगद्वारेच टोल, अन्यथा दुप्पट रक्कम भरावी लागणार

१ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोल नाके पूर्णपणे कॅशलेस होणार असून आता १०० टक्के टोल वसुली फास्ट टॅग (FASTag,) द्वारेच केली जाणार आहे. टोल प्लाझांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय संबंधित प्राधिकरणांनी घेतला आहे.

Badlapur
मुंबई

Badlapur : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरण, पोलिसांची मोठी छापेमारी, घरगुती आयव्हीएफ केंद्रातून 8 लाखांचा इंजेक्शन औषधसाठा जप्त

राज्याला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये तीन ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून बेकायदेशीररीत्या घरांमध्ये सुरू असलेल्या आयव्हीएफ केंद्रातील इंजेक्शन आणि औषध जप्त केले आहेत. पोलिसांनी सुमारे आठ लाख रुपयांचे इंजेक्शन आणि विविध औषधसाठा जप्त केला आहे.

Mangal Prabhat Lodha
देश-विदेश

Mangal Prabhat Lodha : ‘महादृष्टी’ प्रकल्पाला केंद्रीय वित्त मंत्रालयाची मंजुरी, मंगलप्रभात लोढा यांची माहिती

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या छाननी समितीने कौशल्य विकास विभागाच्या महत्वाकांक्षी ‘महादृष्टी’ प्रकल्पाला मंजुरी दिली असून एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून सुमारे चार हजार कोटींचे अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कौशल विकासात महाराष्ट्र घेणार उंच भरारी घेणार असून समाजातील दुर्बल घटकांनाही याच होणार लाभ असल्याचे कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

Aditya Thackeray
मुंबई

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी दाव्याने थेट शरद पवारांची उमेदवारी धोक्यात

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात अस्वस्थता पसरली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षात राज्यसभेच्या दोन जागांवरून सुंदोपसुंदी चालू झाली आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी दोन्ही जागांवर दावा सांगितल्याने थेट शरद पवारांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

High Court
मुंबई

High Court : हे तर गुप्तचर यंत्रणेचं अपयश! नौदलाच्या तळाजवळ इमारत बांधलीच कशी? हायकोर्टाने नेव्हीला पुन्हा फटकारलं

सागरी दलाचे प्रमुख हवाई तळ असलेल्या कुलाबा परिसरात २३ मजली उत्तुंग इमारत उभी राहतेच कशी?, हे नौदलाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचे अपयश असल्याचे ताशेरे आज उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा ओढले. या परिसरात अनेक टोलेजंग इमारती असताना केवळ एकाच इमारतीच्या बांधकामाला आक्षेप घेण्याच्या नौदलाच्या भूमिकेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

delhi

Rohit Pawar व्हीएसआर कंपनीच्या मागे प्रभावशाली लोक, नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची रोहित पवार यांची मागणी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या व्हीएसआर कंपनीच्या मागे काही प्रभावशाली लोकांचा हात आहे. त्यामुळे या कंपनीवर अद्यापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही, असा आरोप केला आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.Rohit Pawar

मुंबई

Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल अवमान याचिकेच्या सुनावणीसाठी शनिवारी (ता.२१ फेब्रु.) राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर झाले. या प्रकरणात, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर हे जामीनदार होते. पाटील यांचे निधन झाल्याने राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे नवीन जामीनदार बनले आहेत. राहुल यांच्या वतीने त्यांचे वकील नारायण अय्यर यांनी न्यायालयात बाजु मांडली. दरम्यान, ठाण्यातील मुलुंड टोल नाका येथे राहुल गांधींच्या आगमना वेळेस भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी त्यांना काळे झेंडे दाखवुन निदर्शने केली. सर्व आंदोलकांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले.Rahul Gandhi

Bhiwgan Case
पुणे

Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी

इंदापूर तालुक्यातील भिगवण प्रकरणातील अपहरण झाल्याची तक्रार असलेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली. संबंधित तरुणासह मुलगी भिगवण पोलीस ठाण्यात पोहोचली. यानंतर पोलीस संबंधित तरुणाला दुसरीकडे घेऊन गेले होते. यानंतर मुलीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. पोलिसांनी संबंधित तरुणीला साडे बारा वाजता कोर्टात हजर केलं. यानंतर संबंधित तरुणीची सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, मुलाची चौकशी करुन निर्णय घेतला जाणार आहे.

Vijay Wadettiwar
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : चंद्रपूर प्रकरणावर काँग्रेस श्रेष्ठी नाराज, विजय वडेट्टीवार यांनी मागितली वरिष्ठांची मागणी

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी आज पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्रासह इतर 6 राज्यांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या बैठकीनिमित्त दिल्लीत दाखल झालेल्या विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर झालेल्या गोंधळाबाबत काँग्रेसच्या वरिष्ठांची माफी मागितली आहे.

Amol Kolhe
पुणे

Amol Kolhe : तुम्ही छत्रपती मांडताय तोपर्यंत या महाराष्ट्रात कोणाच्या बापाला घाबरायचे नाही, अमोल कोल्हे यांचा इशारा

जोपर्यंत तुम्ही छत्रपती मांडताय तोपर्यंत या महाराष्ट्रात कोणाच्या बापाला घाबरायचे नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी ठामपणे सांगितले.