Amol Kolhe : तुम्ही छत्रपती मांडताय तोपर्यंत या महाराष्ट्रात कोणाच्या बापाला घाबरायचे नाही, अमोल कोल्हे यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

पुणे : Amol Kolhe जोपर्यंत तुम्ही छत्रपती मांडताय तोपर्यंत या महाराष्ट्रात कोणाच्या बापाला घाबरायचे नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी ठामपणे सांगितले.Amol Kolhe

कोल्हे यांचे पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. परंतु, या व्याख्यानाला काही संघटनांनी विरोध केला.Amol Kolhe

खासदार कोल्हे म्हणाले, मला विरोध का केला गेला हे मला माहित नाही. परंतु सावित्रीबाई फुले विद्यापीठाने मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे व्याख्यान आयोजित करायचे होते, या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती. त्यानुसार मला विद्यापठाणे निमंत्रण दिले. मला आत्ता काही माध्यमकर्मींकडूनच समजत आहे की काही संघटनांनी मला विरोध केला आहे. परंतु, यांची कुठलीही कल्पना नाही. आज मी इतह इथे आलो आहे. माझी विरोध करणाऱ्यांना विनंती आहे, की त्यांनी माझे व्याख्यान ऐकावे आणि प्रश्न विचारा.



विरोध करणे ही काही नवीन गोष्ट नाही. कारण ज्या छत्रपतींच्या विषयी बोलायला येतोय, त्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला देखील विरोध झाला आहे. याच पुण्यात त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याला देखील विरोध झाला आहे. पहिला पुतळा उभारण्याला सुद्धा विरोध झाला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही तब्बल 180 वर्ष लोकांच्या स्मरणात राहिली नाही. याही वस्तुस्थिती आहेत. त्यामुळे मला असे वाटते की कुठलेही व्याख्यान करणे विद्यार्थ्यांशी संवाद साधणे हा वैचारिक भाग आहे. आणि मी जेव्हाही छत्रपतींची भूमिका साकारतो तेव्हा राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून करतो, असे खासदार कोल्हे यांनी सांगितले.

मला असे वाटते की जेव्हा विरोधाला चेहरा नसतो तेव्हा विचारांची भीती ही त्यांच्या मनात बसलेली असते तेव्हा विरोधाला असा कोणतातरी मुखवटा घेऊन पुढे यायचा प्रयत्न होतो, तसा काही प्रकार असेल, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले. तसेच चेहरा जर समोर आला असता आणि नेमका काय विरोध आहे हे कळले असते तर मला त्यांच्याशी संवाद सधायला बरं वाटलं असतं, असेही कोल्हे यांनी म्हटले.

अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती मांडत असताना बाबा कधी कोणाला घाबरायचं नसतं, कधी कोणाचा इतर विचार करायचा नसतो. जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे छत्रपती मांडताय न तोपर्यंत कोणाच्या बापाला या महाराष्ट्रात घाबरायचे कारण नाही.

As Long As You Stand With Chhatrapati, Fear No One In Maharashtra, Warns Amol Kolhe

महत्वाच्या बातम्या