विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: FASTag १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोल नाके पूर्णपणे कॅशलेस होणार असून आता १०० टक्के टोल वसुली फास्ट टॅग (FASTag,) द्वारेच केली जाणार आहे. टोल प्लाझांवर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय संबंधित प्राधिकरणांनी घेतला आहे.FASTag
नव्या नियमानुसार, ज्या वाहनांकडे वैध FASTag नसेल किंवा खात्यात पुरेशी शिल्लक नसेल, अशा वाहनांना रोख रक्कम देऊन टोल भरण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा वाहनांकडून दुप्पट टोल आकारला जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आपले FASTag खाते सक्रिय ठेवून त्यात पुरेशी रक्कम असल्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.FASTag
वाहतूक कोंडी कमी करणे, टोल नाक्यांवरील रांगा टाळणे आणि इंधनाची बचत करणे या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बहुतेक वाहनांवर आधीच FASTag बसवण्यात आले असल्याने कॅशलेस व्यवस्थेकडे संक्रमण सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
डिजिटल टोल वसुलीमुळे पारदर्शकता वाढणार असून मानवी त्रुटी कमी होतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून टोल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांना FASTag संबंधित अडचणी सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एप्रिलपासून महामार्गावरून प्रवास करताना रोख रक्कम उपयोगाची ठरणार नाही; वैध FASTag असणे बंधनकारक असणार आहे.
No Cash at Toll Booths from April 1; 100% FASTag Rule Kicks In
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका