Sachin Pilot : अमेरिकेबरोबरचा व्यापार करार दबावाखाली, देशहित गहाण ठेवून, सचिन पायलट यांची टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sachin Pilot व्यापार करार हे आर्थिक प्रगतीचे साधन असतात, परंतु ते समान अटींवर आणि परस्पर लोकहिताच्या आधारावर असले पाहिजेत. देशाच्या सार्वभौमत्वाचा त्याग करून गुलामीकडे नेणारे करार कदापी स्वीकारार्ह नाहीत. व्यापार कराराच्या आडून देशहित आणि लोकहिताची आहुती देता येणार नाही. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार हा दबावाखाली केला असून तो भारतातील अन्नदात्यांचा गळा घोटणारा आहे, असा गंभीर आरोप करून भारतातील 144 कोटी जनता हे कधीही स्वीकारणार नाही, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केली.Sachin Pilot



टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन पायलट म्हणाले, भारत-अमेरिका व्यापार करारात मोदी सरकारने भारतातील शेतकरी आणि शेती क्षेत्राच्या हितांचे नुकसान केले आहे. ऊर्जा सुरक्षेशी तडजोड केली आहे. डिजिटल स्वायत्तता आणि डेटा गोपनीयतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भारत व भारतातील शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्याऐवजी भाजपा सरकारने सार्वभौमत्व आणि आत्मनिर्भरतेशी तडजोड केली आहे. अमेरिकेबरोबरच्या कराराची घोषणा सुद्धा अमेरिकेनेचे केली. याआधी युद्धबंदीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. भारतात “मजबूत सरकार” आहे की “मजबूर सरकार”? “आत्मनिर्भर भारत” आहे की “अमेरिका-निर्भर भारत”? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

US Trade Deal Under Pressure, National Interest Being Mortgaged: Sachin Pilot Slams Government

महत्वाच्या बातम्या