विशेष प्रतिनिधी
पिंपरी : MLA Shelke मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रुपये घेतल्याचा स्फोटक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर केला आहे. या आरोपांमुळे मावळमधील राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.MLA Shelke
शेळके यांनी दावा केला की, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काही उमेदवारांकडून प्रत्येकी २५ ते ३५ लाख रुपये घेतले. “निवडून आणतो, नाही तर पैसे परत” अशी हमी देत ईव्हीएम मशीन हॅक करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप त्यांनी केला. या व्यवहाराचे तपशील, बँक खात्यांवरील व्यवहारांची माहिती आणि संबंधित व्यक्तींची नावे माझ्याकडे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.MLA Shelke
भाजपने हे सर्व आरोप फेटाळत आठ दिवसांत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिला. आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून बाजूला होऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.
यावर प्रत्युत्तर देताना आमदार शेळके म्हणाले, “दावा दाखल करा. मला न्यायालयाचे समन्स येऊ द्या. मी पोलिसांकडे आणि न्यायालयात सर्व पुरावे सादर करण्यास तयार आहे.” ते लवकरच पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे लेखी तक्रार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेळके यांनी पुढे दावा केला की, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम हॅक करणारे एक रॅकेट कार्यरत असून त्यामध्ये मावळमधील काही स्वयंघोषित नेत्यांचा सहभाग आहे. काही संशयित व्यक्ती आळंदी, शेलारवाडी आणि वडगाव शेरी येथील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मावळमधील सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. या पार्श्वभूमीवर हा वाद अधिकच तीव्र झाला आहे.
EVM Hacking Row In Maval: MLA Shelke Alleges ₹25–35 Lakh Payoffs; Dares BJP To File Defamation Case
महत्वाच्या बातम्या
- सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखीच बनावट, आदित्य ठाकरे यांची टीका
- राज्यसभेत शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या अटी
- शिवजयंतीनिमित्त महसूल विभागाची मोठी घोषणा; एका दिवसात १५ महसूल सेवा निकाली काढणार
- रोहित पवार यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, सुप्रिया सुळे यांची मागणी