विशेष प्रतिनिधी
पुणे : Sangram Jagtap भिगवणमधील अपहरण प्रकरणातील 21 वर्षीय तरुणी आणि मुलगा गुरूवारी मध्यरात्री पोलिसांसमोर हजर झाले. तरुणीने या संदर्भातील प्रतिज्ञापत्र तयार केले असून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे. आमचे एक वर्षांपासून प्रेम संबंध होते. त्यामुळे मी माझ्या मर्जीने झहीर शेख सोबत आली असून या संदर्भातील प्रतिज्ञापत्र देखील तयार केले आहे, असे या तरुणीने सांगितले.Sangram Jagtap
भिगवण अपहरण प्रकरण एक बनाव असल्याचे उघड झाले आहे. आई-भावासोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेलेली असताना तरुणीचे दोघांनी अपहरण केल्याची तक्रार दिली गेली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हाही दाखल केला होता, पण तरुणीनेच एक व्हिडीओ जारी करत आपण स्वतःहून पळून आल्याचे सांगितले. ती तरुणी आणि तरुण कुठे आहेत, याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. ही तरुणी गुरुवारी मध्यरात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात स्वतःहून आली. पोलीस तिला पोलीस ठाण्यातून सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले.Sangram Jagtap
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला उचलून नेल्याची घटना मंगळवारी घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा पथके स्थापन केली होती. तिचा शोध सुरू असतानाच तरुणी गुरुवारी मध्यरात्री १.३० वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. हे प्रकरण संवेदनशील असल्याने तिला पोलीस तातडीने दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले.
अपहरण झाल्याच्या प्रकरणाला धार्मिक रंगही राजकीय नेत्यांनी दिल्याने इंदापूर आणि भिगवणमध्ये तणाव वाढला होता. मात्र, तरुणीने तरुणासोबत एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तिने आपले अपहरण झालेले नसून, मी स्वमर्जीने पळून आले आहे, असे उघड केले. त्याबरोबर जहीर शेख या तरुणासोबत आपले ९ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा खुलासाही या तरुणीने केला आहे. माझ्यावर कोणतीही जबरदस्ती करण्यात आली नाही. मी कोणाच्याही दबावाखाली नाही. मी स्वतःहून त्याच्यासोबत आली असल्याचे तरुणीने म्हटले आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तरुण-तरुणीमध्ये प्रेमसंबंध असल्याचेच दिसत आहे. गेल्या दीड महिन्यामध्ये तरुणी आणि तरुण यांच्यात ११ वेळा संपर्क झाला होता. मुलीने स्वतःहून ८ वेळा तरुणाला मेसेज केलेले आहेत. तरुणाने तरुणीला केलेले ३ कॉल्स हे मध्यरात्री उशिराचे आहेत. दोघे बोलण्यासाठी व्हॉट्सअपचा वापर करायचे. त्यामुळे पोलिसांनी आता त्यांच्या व्हॉट्सअप संभाषणाची माहितीही मागवली आहे.
I will stay with Zaheer! Affidavit of Bhigwan’s girl alleging false allegations against Gopichand Padalkar, Sangram Jagtap
महत्वाच्या बातम्या
- सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखीच बनावट, आदित्य ठाकरे यांची टीका
- राज्यसभेत शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या अटी
- शिवजयंतीनिमित्त महसूल विभागाची मोठी घोषणा; एका दिवसात १५ महसूल सेवा निकाली काढणार
- रोहित पवार यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, सुप्रिया सुळे यांची मागणी