विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवजयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयाेजित करण्यात आलेल्या खासदार डाॅ. अमाेल काेल्हे यांच्या व्याख्यानाला विद्यार्थी संघटनांनी विराेध केला आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निमंत्रण कशाला असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. Dr. Amol Kolhe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इरावती कर्वे सभागृहात डॉ. कोल्हे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त करत विराेध सुरू केला आहे. Dr. Amol Kolhe
‘सकल विद्यार्थी समूहा’च्या वतीने कुलगुरूंना सह्यांचे पत्र सादर करण्यात आले आहे. या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा सर्व समाजाचा एकत्रित उत्सव असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा दिवशी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निमंत्रण देणे योग्य नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. शिवजन्मोत्सव विद्यार्थी उत्सव समितीला कार्यक्रमाबाबत पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचाही उल्लेख पत्रात आहे. विद्यापीठ प्रशासनाने अशा कार्यक्रमाला अधिकृत पाठिंबा दिला आहे का, याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. Dr. Amol Kolhe
काही विद्यार्थ्यांनी डॉ. कोल्हे यांच्या समर्थनार्थ स्वतंत्र पत्र सादर केले आहे. विद्यापीठात दरवर्षी विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अभ्यासू आणि प्रेरणादायी वक्त्यांना आमंत्रित केले जाते, असे त्यांनी नमूद केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून अमोल कोल्हे यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. Dr. Amol Kolhe
दरम्यान, या वादावर स्वतः डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही विद्यार्थी संघटनांनी माझ्या व्याख्यानाला विरोध केला असल्याचे कळले आहे, मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून मला कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजता होणाऱ्या व्याख्यानासाठी मी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती देणे हे माझे कर्तव्य आहे आणि अशा कार्यक्रमांना जाताना मी राजकीय भूमिका बाजूला ठेवतो, असेही त्यांनी म्हटले आहे. Dr. Amol Kolhe
Student organizations protest against the lecture of MP Dr. Amol Kolhe at Savitribai Phule Pune University
महत्वाच्या बातम्या
- सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखीच बनावट, आदित्य ठाकरे यांची टीका
- राज्यसभेत शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या अटी
- शिवजयंतीनिमित्त महसूल विभागाची मोठी घोषणा; एका दिवसात १५ महसूल सेवा निकाली काढणार
- रोहित पवार यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, सुप्रिया सुळे यांची मागणी