विशेष प्रतिनिधी
नाशिक: विलीनीकरण झालं सुद्धा नाही, त्या अगोदर कोणत्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे देखील ठरलं असेल. राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हेदेखील ठरले असेल. कोणी काही सांगितलं तर आपण त्याच्यावर काय बोलणार, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची खिल्ली उडवली.Chhagan Bhujbal
राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर अजित पवार यांना संघटनेत अनेक बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी कोणीतरी तरुण असावं असं त्यांना वाटत होतं. अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळेच अमोल कोल्हे अनेक बैठकांमध्ये होते, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. छगन भुजबळ या दाव्याची खिल्ली उडवताना म्हणाले, सगळेच ठरवले होते तर आम्हाला माहीत कसे नव्हते.Chhagan Bhujbal
अजितदादा आज नाहीत, त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य नाही. मात्र, दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात अनके बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी कोणीतरी तरुण असावं असं त्यांना वाटत होतं. अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळेच अमोल कोल्हे अनेक बैठकांमध्ये होते. त्यादृष्टीने चर्चा होत होत्या. पण आज दादा राहिले नाहीत, ज्यांच्यासोबत आम्हाला कंफर्ट होता. त्यांची भावनिक इच्छा होती, राजकीय इच्छा दुय्यम होती. दोन्ही पक्ष कुटुंब एकत्र यावेत असं त्यांना वाटत होते. Chhagan Bhujbal
डॉ. अमोल कोल्हे हे संयुक्तित राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले असते, अशी दादांचीच इच्छा होती. त्यामुळेच, ते प्रामुख्याने बैठकीत पुढाकार घेत होते. ज्यांच्या घरी यासंदर्भात 13 बैठका झाल्या, त्या जयंत पाटील यांच्या घरासमोरील सीसीटीव्हीत तुम्हाला दादा दिसून येतील, असे रोहित पवार यांनी सांगितले होते.