विशेष प्रतिनिधी
पुणे : Jay Pawar विमान अपघातात ब्लॅक बॉक्स इतक्या सहजासहजी नष्ट होऊ शकत नाहीत. या घटनेचे गांभीर्य ओळखून व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणांवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी केली आहे.Jay Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाल्याच्या चर्चा सुरू असतानाच, त्यांचे पुत्र जय पवार यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.Jay Pawar
जय पवार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले की, विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही; महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे. तसेच व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालून, त्यांच्या विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे, अशी मागणी जय पवार यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघातावर त्यांच्या कुटुंबाकडून प्रथमच जाहीर प्रतिक्रिया आली असून, चिरंजीव जय पवार यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या घटनेचे पारदर्शक सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमान उड्डाणांवर तात्काळ बंदी घालण्याची आणि विमानांच्या देखभालीतील संभाव्य गंभीर गैरव्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावर जय पवार यांची भूमिका रोहित पवारांच्या मागणीशी सुसंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘Can a Black Box Be Destroyed So Easily?’ Jay Pawar Demands Ban on VSR Flight Operations
महत्वाच्या बातम्या
- स्वीकृत सदस्य म्हणजे काय? महानगरपालिका स्वीकृत सदस्यांची निवड कशी केली जाते?
- अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील नाेंदणी साधनांचे आगीमुळे नुकसान, तपास यंत्रणेकडून प्रथमच अधिकृत माहिती
- खारगे समितीची पार्थ पवार यांना क्लिन चिट, राज्यसभेवर जाण्याचा मार्ग माेकळा
- Chief Minister : शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती