Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक आणि महापाप केले तो महापौर, देवेंद्र फडणवीस यांची मिश्किल टिप्पणी

महापौर आणि नगरसेवकाचे काम किती कठीण असल्याचे सांगताना ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केले तो महापौर होतो, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Parth Pawar
मुंबई

Parth Pawar : पार्थ पवारांशी संबधित मुंढवा जमीन गैरव्यवहार चौकशी समितीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ

पुण्यातील मुंढवा येथील शासकीय जमिनीची पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला विक्री केल्याप्रकरणी राज्य सरकारने चौकशीसाठी नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीला एक महिन्याची मुदतवाढ देऊन 6 जानेवारीला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र हा अहवाल अद्यापही पूर्ण न झाल्याने या समितीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Shivaji Park
मुंबई

Shivaji Park : शिवाजी पार्कसाठी राजकीय फिल्डिंग: शेवटचे तीन दिवस फटकेबाजी

वर्षभर क्रिकेटमध्ये रंगून जाणारे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आता लवकरच राजकीय चौकार-षटकारांची आतषबाजी होताना दिसणार आहे. प्रत्येकच निवडणुकीत या मैदानाने आपले महत्व कायम अधोरेखित केले आहे.

Nitesh Rane
महाराष्ट्र

Nitesh Rane : आपल्या बॅगा भरून ठेवा…नीतेश राणे यांनी दिला राेहिंग्या – बांगलादेशींना इशारा

मी सर्व मुस्लिमांच्या विरोधात नाही, राष्ट्रवादी विचारांचे मुस्लिम आमच्यासोबत आहेत. पण ज्यांना ठोकायचं आहे, ते मला चांगलं माहिती आहे. १५ तारीख याद राखा आणि आपल्या बॅगा भरून ठेवा. १६ तारखेनंतर एकही बांगलादेशी किंवा रोहिंग्या मुंबईत दिसणार नाही, असा इशारा भाजप नेते व मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला आहे.

BJP’s Promise
पुणे

BJP’s Promise : भाजपचा संकल्प : पुण्यासाठी एक हजार ई-बस, मेट्रोसह विमानतळाचा विस्तार

पुणेकर हे विकासाला सदैव पाठिंबा देणारे असून शहराला अधिक विकसित, स्वच्छ आणि आधुनिक बनविण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी मांडलेली दूरदृष्टीपूर्ण ‘ब्ल्यू प्रिंट’ प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

Murlidhar Mohol
पुणे

Murlidhar Mohol : पुणेकरांना नवीन कारभारी नको, मुरलीधर मोहोळ यांचा अजित पवारांवर पलटवार

महापालिकेमध्ये २०१७ पूर्वी ज्यांची सत्ता होती, त्यांनी पुणेकरांची निराशा केली. त्यामुळे पुणेकरांनी शहराचा कारभारी बदलून भाजपला सत्ता दिली. आम्ही सत्ताकाळात पुणेकरांसाठी विकास कामे केल्याने या निवडणुकीत पुणेकरांना नवीन कारभारी नको आहे, असे उत्तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

Shiv Sena
मुंबई

Shiv Sena : शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हाजी सालिन कुरेशी यांच्यावर प्राणघातक हल्ला

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच बांद्रा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञाताने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोराने कुरेशी यांच्या पोटात थेट चाकू भोसकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Parth Pawar
मुंबई

Parth Pawar : पार्थ पवारांशी संबधित मुंढवा जमीन गैरव्यवहार चौकशी समितीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ

पुण्यातील मुंढवा येथील शासकीय जमिनीची पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला विक्री केल्याप्रकरणी राज्य सरकारने चौकशीसाठी नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीला एक महिन्याची मुदतवाढ देऊन 6 जानेवारीला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र हा अहवाल अद्यापही पूर्ण न झाल्याने या समितीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Nivrutti Anna Bandal
महाराष्ट्र

Nivrutti Anna Bandal : “भांडून का होईना, पण पाणी घेऊन येईन !” – निवृत्ती अण्णा बांदल यांचा निर्धार

महंम्मदवाडी-उंड्री हा परिसर पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पहिल्यांदाच येथे निवडणूक होत आहे. त्यामुळे या प्रभागाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उंड्री गावाचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते असलेले निवृत्ती अण्णा बांदल (Nivrutti Anna Bandal)  हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

AMARATH
मुंबई

Ambernath : भाजपशी युती करणारे अंबरनाथमधील बारा नगरसेवक काॅंग्रेसकडून निलंबित

अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाशी युती करणाऱ्या बारा नगरसेवकांना काॅंग्रेस पक्षाने दणका दिला आहे. या बाराही नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

मुंबई

Election Commission : ‘भगवा’ शब्द वापरल्याने निवडणूक आयाेगाने नाकारले भाजपचे प्रचार गीत

Election Commission: भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसीठी तयार केलेल्या प्रचार गीतामध्ये ‘भगवा’ हा शब्द वापरण्यात आल्याने निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदवला आहे. निवडणूक आचारसंहितेच्या निकषांनुसार धार्मिक किंवा भावनिक स्वरूपाचे शब्दप्रयोग प्रचारात आक्षेपार्ह ठरू शकतात, असा ठपका ठेवत आयोगाने हे गीत नाकारले आहे.

Chief Minister
महाराष्ट्र

Chief Minister : काँग्रेस आणि एमआयएमसोबत भाजपची युती कधीच नाही, मुख्यमंत्र्यांनी टाेचले स्थानिक नेत्यांचे कान

काँग्रेस आणि एमआयएमसोबत भाजपची युती कधीच होऊ शकत नाही. हे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अशी तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister ) यांनी अकाेट आणि अंबरनाथमधील स्थानिक नेत्यांचे कान टोचले आहेत.