Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Bawankule
पुणे

Bawankule : मागची पाने उघडली, तर अजित पवारांनाही बोलता येणार नाही : सिंचन घोटाळ्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट इशारा दिला आहे. “मागची पाने उघडली, तर अजित पवारांनाही बोलता येणार नाही,” असे तीव्र वक्तव्य बावनकुळे यांनी केले.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : अजित पवारांनी दिले राष्ट्रवादीच्या पुनर्मिलनाचे संकेत; शरद पवारांच्या नेतृत्वाचे कौतुक

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत “मागचे झाले गेले गंगेला मिळाले, आता आपल्याला एकोप्याने काम करायचे आहे,” असे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुनर्मिलनाचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : मुंबईत ८७ ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना, भाजप आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात ९७ जागांवर सामना

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध shivसेना (ठाकरे बंधू) हे ८७ जागांवर परस्परांसमोर उभे असून, येथे थेट रंगतदार लढती होणार आहेत.

Devedra Fadanvis
मुंबई

Devedra Fadanvis : राज्यभरातील अडीच लाख रिक्त पदे भरा ! राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्य सरकारच्या विविध विभागातील ३ टक्के पदे दरवर्षी सेवानिवृत्तीने रिक्त होत असतात तर सध्या राज्यभरातील विविध विभागातील अडीच लाख पदे रिक्त आहेत. यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडतो. राज्य सरकारने लोकसेवा आयोग, जिल्हा निवड मंडळे इत्यादी मार्गाने निश्चित कालावधीत भरण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे. याबाबत संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

Rahul Narwekar
मुंबई

Rahul Narwekar : राहुल नार्वेकरांच्या कृतीविरोधात कुलाब्यातील इच्छुक उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांच्याशी संबंधित वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचलाय. राहुल नार्वेकरांच्या कृतीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झालीय. कुलाबा प्रभागातील इच्छुक उमेदवार बबन महाडिक यांच्यासह इतरांनी दाखल केलेली ही याचिका मंगळवारी न्यायालयापुढं तातडीच्या सुनावणीसाठी दाखल करण्यात आली. मात्र, मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं यावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार देत याचिकाकर्त्यांना नियमित सुनावणीकरता वाट पाहण्याची सूचना केलीय.

Ashish Shelar
पुणे

Ashish Shelar : सावरकरांचे विचार मान्य असतील तर तुमच्या बरोबर, आशिष शेलार यांचा अजित पवारांना इशारा

तुम्हाला सावरकरांचे विचार मान्य असतील तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्याविना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचे काम करू,” असा इशारा भाजपचे नेते आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला.

Rohit Pawar
महाराष्ट्र

Rohit Pawar : एमसीए निवडणुकांना मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती, रोहित पवारांना मोठा धक्का

मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) निवडणुकांना स्थगिती दिल्याने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. ६ जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुका न्यायालयाच्या आदेशामुळे तूर्तास थांबवण्यात आल्या आहेत.

Ravindra Chavan
महाराष्ट्र

Ravindra Chavan : विलासराव देशमुखांच्या आठवणी पसुल्या जातील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे वादग्रस्त वक्तव्य

भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पसुल्या जातील यात शंका नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा कॉंग्रेसकडून जोरदार निषेध केला जात आहे.

महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? असा प्रतिसवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे.

Deonar
मुंबई

Deonar : देवनारमध्ये पकडली कोटी 33 लाख रुपयांची रोख रक्कम

मुंबईतील देवनार परिसरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. एका संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता, त्यात तब्बल 2 कोटी 33 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : देवा भाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही!

देवा भाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. लाडक्या बहिणीना आता लखपती दिदी बनवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
परभणीच्या दौऱ्यावर असताना सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,

मुंबई

Harshvardhan Sapkal : महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

Harshvardhan Sapkal : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फ्री अँड फेअर निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी लोकशाही गुंडाळून टाकली असून पैशाचा खेळ सुरु आहे. मतदानाआधीच घोडेबाजार सुरु असून भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली आहे.