Ravindra Chavan : विलासराव देशमुखांच्या आठवणी पसुल्या जातील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे वादग्रस्त वक्तव्य

विशेष प्रतिनिधी

लातूर:  Ravindra Chavan भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पसुल्या जातील यात शंका नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा कॉंग्रेसकडून जोरदार निषेध केला जात आहे.Ravindra Chavan

मेळावा झाल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलणे टाळले आहे. त्यामुळे विलासराव देशमुखांवर त्यांनी केलेल्या विधानावर अधिक खुलासा झाला नाही. परंतु, त्यांनी केलेल्या या विधानामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह लातूरकरांच्या देखील भावना दुखावल्या गेल्या आहेत.Ravindra Chavan



कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. सपकाळ म्हणाले, स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केले. आज त्यांच्याबद्दल हे सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूरात येऊन बरळून जातात की साहेबांच्या आठवणी पुसल्या गेल्यात. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख साहेबांचे लातूरशी असलेले नाते. लातूरच्या कर्तुत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही, भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा, अशा शब्दांत सपकाळ यांनी इशारा दिला आहे.

Memories of Vilasrao Deshmukh Will Fade Away, Says BJP State Chief Ravindra Chavan, Sparks Controversy

महत्वाच्या बातम्या