Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Narayan Rane
महाराष्ट्र

Narayan Rane : उपशाखाप्रमुखाची हत्या करणार होतो, नारायण राणे यांनी सांगितला बाळासाहेबांचा किस्सा

मी एका उपशाखाप्रमुखाची हत्या करणार होतो, पण बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी मला समजावले, असा किस्सा माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी सांगितला.

Owaisi
देश-विदेश

Owaisi : लव्ह जिहाद’ची नेमकी व्याख्या स्पष्ट करा : ओवेसी यांचे भाजप आणि आरएसएसला आव्हान

लव्ह जिहाद’सारखे प्रकार खरोखरच घडत असतील, तर त्याबाबतचा अधिकृत आणि तपशीलवार डेटा संसदेत सादर का केला जात नाही, असा थेट सवाल एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. गेल्या ११ वर्षांतील सर्व प्रकरणांचा रेकॉर्ड जाहीर करा आणि ‘लव्ह जिहाद’ची नेमकी व्याख्या काय आहे, हे भाजप आणि आरएसएसने स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

CM Fadnavis
मुंबई

CM Fadnavis : तुम्हाला जेलमध्ये कोणी टाकलं?’ मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना थेट सवाल

बई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या संयुक्त वचननाम्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तीव्र आणि खोचक शब्दांत हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना भवनात २० वर्षांनंतर आल्यावर “जेलमधून बाहेर आल्यासारखं वाटतंय” असे विधान केल्यानंतर, त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी “तुम्हाला जेलमध्ये कोणी टाकलं होतं? कोणत्या गुन्ह्यात जेलमध्ये गेला होतात?” असा थेट सवाल उपस्थित केला.

CM Devendra Fadnavis
मुंबई

CM Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंची युती करप्शन आणि कन्फ्यूजची , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

ठाकरे बंधूंची जी युती झाली आहे ती करप्शन आणि कन्फ्यूजची झाल्याचा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आज ठाकरे बंधूंनी आपला वचननामा जाहीर केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदिवलीत बोलतांना त्याची खिल्ली उडवली

Sahitya Sammelan
महाराष्ट्र

Sahitya Sammelan : सातारा साहित्य संमेलनात सीमाप्रश्नी आंदोलन; घोषणाबाजीने समारोप सोहळ्यात गोंधळ

साताऱ्यात आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यावेळी महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नी पुन्हा एकदा आंदोलनाचा आवाज उठला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी अचानक घोषणाबाजी करत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ संमेलनस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

unique inauguration
पुणे

ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजन सोहळ्याने निवडणूक कचेरीचे अनोखे उद्घाटन

भाजपच्या प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन एका अनोख्या आणि भावनिक सोहळ्यात पार पडले. पक्षासाठी निस्वार्थपणे आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या त्यागाला, निष्ठेला आणि सेवेला वंदन करत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

Congress
महाराष्ट्र

Congress : वंचितच्या ‘गॅस’मुळे मुंबईत काँग्रेस गॅसवर

मुंबई महापालिका निवडणुकीत 16 जागांवर उमेदवार मिळाले नसल्याने अडचणीत सापडलेल्या काँग्रेस (Congress ) -वंचित आघाडीला आता आणखी एका अडचणीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

मुंबई

CM Devendra Fadnavis : मुंबईत श्रेय लुटणारी टोळी सक्रिय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

CM Devendra Fadnavis : मुंबईत सध्या श्रेय लुटणारी एक टोळी सक्रिय झाली असून काही अबोध बालकं सगळं आम्हीच केलं, असा दावा करत आहेत. मात्र मुंबईकरांना सत्य माहीत आहे,” असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केला.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : गुन्हेगाराने मर्डर केला तर त्याचं खानदान दोषी नसते, आंदेकर – मारणे उमेदवारीवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कुख्यात गुंडांच्या घरातील सदस्यांना ‘घड्याळ’ चिन्हावर उमेदवारी मिळाल्यामुळे विरोधकांनी अजित पवारांना लक्ष्य केले होते. यावर आज अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत, गुन्हेगाराने मर्डर केला तर त्याचं खानदान दोषी नसते, असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अजित पवार आणि आरपीआयचे नेते सचिन खरात यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्राकरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी रोखठोक भूमिका मांडली.

Shinde
महाराष्ट्र

Shinde : इच्छुक उमेदवाराने थेट पत्नीसह आत्महत्येचा इशारा, शिंदे गटाच्या उमेदवाराची नाशिकमध्ये पोस्ट

नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी बंडाळी उफाळून आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका इच्छुक उमेदवाराने थेट पत्नीसह आत्महत्येचा इशारा दिला.
नाशिकमधील प्रभाग क्रमांक ३१ मधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवा तेलंग यांनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. शिवा तेलंग यांनी तिकीट वाटपावरून पत्नीसह आत्महत्येचा इशारा दिला असून, प्रमुख नेत्यांवरही गंभीर आरोप केलेत.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray : बिनविरोधवर संताप: राज ठाकरे म्हणतात उभ्या आयुष्यात मी अशी निवडणूक पाहिली नाही

राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असले तरी, अनेक प्रभागांमध्ये आतापासूनच विजयाचा उत्सव सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातील 70 जागी विरोधी उमेदवारांची माघार किंवा एकच उमेदवार रिंगणात उरल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त करत, “उभ्या आयुष्यात मी अशी निवडणूक पाहिली नाही,” असे विधान केले आहे.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : पुण्याचा त्रिकुट कारभार बदला; इच्छाशक्तीअभावी शहराची अवस्था बिकट, अजित पवार यांची भाजपवर टीका

पुण्याचा त्रिकुट कारभार बदलण्याची गरज असून इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट झाली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार विकासकामे, कारभार आणि नागरी सुविधांचा विचार करतात. त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक पुण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.