विशेष प्रतिनिधी
नाशिक : Shinde नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी बंडाळी उफाळून आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका इच्छुक उमेदवाराने थेट पत्नीसह आत्महत्येचा इशारा दिला.Shinde
नाशिकमधील प्रभाग क्रमांक ३१ मधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवा तेलंग यांनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. शिवा तेलंग यांनी तिकीट वाटपावरून पत्नीसह आत्महत्येचा इशारा दिला असून, प्रमुख नेत्यांवरही गंभीर आरोप केलेत.Shinde
शिवा तेलंग यांनी आपल्या पत्रात माजी नगरसेवक सुदाम ढेमसे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. २०२२ पासून प्रभाग ३१ मध्ये सक्रिय असूनही केवळ राजकीय वापर करून घेतला आहे. २९ डिसेंबरला कॅनडा कॉर्नर येथे एबी फॉर्मचे वाटप सुरू असताना मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाली. एबी फॉर्मसाठी पैशांची मागणी करण्यात आली आणि पैसे घेऊनच फॉर्म देण्यात आले. एकाच प्रभागात दोन जणांना एबी फॉर्म दिल्याने संभ्रम निर्माण झाला. हेमंत गोडसे, विजय करंजकर, जयंत साठे, राजू लवटे, आणि प्रवीण बंटी तिदमे यांसारख्या नेत्यांचा या प्रक्रियेत सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला.Shinde
पत्र पोस्ट केल्यानंतर तेलंग नॉट रिचेबल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊनही स्थानिक पातळीवर वरिष्ठांच्या आदेशाला फेटाळण्यात आले. मी उद्या तुमच्यामध्ये नसणार आहे. माझ्या आत्महत्येस सुदाम ढेमसे, विजय करंजकर, हेमंत गोडसे यांच्यासह आठ नेते जबाबदार राहतील, असेही शिवा तेलंग यांनी आपल्या पत्रात नमूद केले. हे पत्र पोस्ट केल्यानंतर शिवा तेलंग हे पत्नीसह ‘नॉट रिचेबल’ असून, कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत असून या प्रकरणामुळे शिंदे गटातील तिकीट वाटप प्रक्रिया आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Shinde Faction Candidate in Nashik Sparks Row After Aspirant Threatens Suicide Along With Wife
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन