विशेष प्रतिनिधी
सिंधूदुर्ग : Narayan Rane मी एका उपशाखाप्रमुखाची हत्या करणार होतो, पण बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी मला समजावले, असा किस्सा माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी सांगितला.
सिंधूदुर्ग येथील सभेत बाेलताना राणे (Narayan Rane) यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “एकदा माझ्या मित्राने मला सांगितलं तू निघू नकोस, आम्ही येतो. नेहमीच्या रस्त्याने तू जायचं नाही. एकाने तुझी टीप दिली आहे. टीप देण्याऱ्याचं मला नाव कळलं. मी त्यांना बोललो मी लगेच येतो. मी लगेच गाडी काढली आणि थेट त्या माणसाच्या घरी गेलो. मी दरवाजा नॉक केला. त्या उपशाखाप्रमुखाच्या पत्नीने मधला दरवाजा उघडला. मी तिला सांगितलं की मी तुझ्या पतीला ठार मारणार. यानंतर दुसऱ्या दिवशी मला बाळासाहेब ठाकरेंनी बोलावलं. मी तिकडे गेलो, तिकडे तो उपशाखाप्रमुखही बसला होता. बाळासाहेब म्हणाले तू या उपशाखाप्रमुखाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला बोललास ठार मारणार? तर मी म्हणालो की हो ठार मारणार. परत बाळासाहेब म्हणाले की मी तुला विचारतोय, तरी तू मारणार म्हणतोस.. मी म्हणालो, या माणसाने दाऊदच्या माणसाला माझी टीप द्यायची ठरवलं, मी त्याला जिवंत ठेवलं तर मी मरणार, त्यापेक्षा मी याला मारलं तर मी जगणार.
बाळासाहेब ठाकरे म्हणाले, नारायण मी तुला एक विनंती करू का. मी तुला सांगतो, तू त्याला जीवनदान देऊ शकतोस का? मी म्हणालो साहेब तुम्ही जे सांगाल ते होईल. बाळासाहेबांनी सांगितले म्हणून मी त्याला जीवनदान दिले. हा किस्सा राणे यांनी भरसभेत सांगितला.
“I Was About To Kill A Shakha Pramukh,” Narayan Rane Recounts Balasaheb Thackeray Anecdote
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut : संजय राऊतांच्या घराबाहेर ‘बॉम्ब’ची धमकी! बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
- ईव्हीएमवरील ईएनडी बटण बंद, मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी निर्णय
- निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत मेधा कुलकर्णींची सूचक पोस्ट; म्हणाल्या, ‘कुछ कह गए, कुछ सह गए…’,
- लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; आरटीआयमधून मोठा गैरप्रकार उघड