BMC Election : मुंबईतून 453 अर्ज मागे, एकूण 1729 उमेदवार निवडणूक रिंगणात
मुंबईतून एकूण 453 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या (BMC Election) 227 जागांसाठी एकूण 1 हजार 729 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
मुंबईतून एकूण 453 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या (BMC Election) 227 जागांसाठी एकूण 1 हजार 729 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
State Election Commission : राज्यातील विविध महापालिकांमध्ये सत्ताधारी पक्षांचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचे प्रमाण वाढत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील अहवाल मागवला आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते किंवा उमेदवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर माघार घेण्यासाठी जबरदस्ती, दबाव किंवा आर्थिक प्रलोभन दाखवले तर नाही ना? याची चौकशी करण्यात येणार आहे. ही चौकशी त्रिस्तरीय होणार असून याचे अहवाल सादर होत नाहीत तोपर्यंत निवडणूक आयोग या प्रभागांमधील निवडणूक अधिकाऱ्यांना सत्ताधारी पक्षाच्या या उमेदवारांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यास परवानगी देणार नाही.
वायनाडच्या काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा याचा साखरपुडा त्याची दीर्घकालीन मैत्रीण अवीवा बेग हिच्याशी पार पडला आहे. या जोडप्याने स्वतः इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी जाहीर केली. रेहान आणि अवीवा यांचा साखरपुडा २९ डिसेंबर २०२५ रोजी पार पडल्याचे त्यांनी पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.
महानगरपालिकेची निवडणूक ही मुघलांविरुद्ध लढलेल्या ऐतिहासिक संघर्षाइतकीच निर्णायक असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. “सूर्याजी पिसाळ जसा ४०० वर्षांनंतरही गद्दार म्हणून ओळखला जातो, तसाच मिंधेही लक्षात राहील,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची काल शेवटची तारीख होती. त्यामुळे आता निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होत असून उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली
२०२० मधील दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीतील कथित सूत्रधार आणि पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असलेला उमर खालिद पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. ‘फ्री उमर खालिद’ मोहिमेला नवे बळ देत अमेरिकेतील आठ डेमोक्रॅट खासदारांनी भारत सरकारकडे उमर खालिदला जामीन देऊन “निष्पक्ष खटला” चालवण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याच्या आदेशाचे पालन करीत जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे मतदान २५ जानेवारीच्या आसपास होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तारखा निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ६ आणि ७ जानेवारीला बैठक बोलावली आहे.
Manjusha Nagpure, Shrikant Jagtap : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पक्ष (भाजप) ने आपले खाते उघडत राजकीय आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी–माणिकबाग येथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपूरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकासाठी ठाकरे बंधू (Thackeray brothers) एकत्र आले असून शिवसेना-मनसेकडून एकत्रितपणे निवडणूक लढवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी घोषणांच्या उंचच उंच इमारती उभारल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र बहिणींचा शोध घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत ‘ई केवायसी’ करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार राज्यातील २ कोटी ४७लाख महिलांपैकी ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील १ कोटी ८० लाख महिलांनी ‘ई केवायसी’ प्रक्रिया पूर्ण अधिकाऱ्याने केल्याचे महिला व बाल विकास विभागातील सांगितले
शहरातील गुन्हेगारी संपवण्याच्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारी यादीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा समावेश कसा होतो, असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला. “शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे, असे पालकमंत्री अजित पवार सांगतात. मात्र त्यांच्या पक्षाची उमेदवारी यादी पाहिली तर त्यात गुन्हेगारांचा समावेश दिसतो. हे कोणत्या तत्त्वात बसते, ते त्यांनी स्पष्ट करावे,” अशी टीका मोहोळ यांनी केली.
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची परंपरा कायम राखत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने निवडणुकीपूर्वीच गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये त भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.