विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Priyanka Gandhi–Robert Vadra वायनाडच्या काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा आणि उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा रेहान वाड्रा याचा साखरपुडा त्याची दीर्घकालीन मैत्रीण अवीवा बेग हिच्याशी पार पडला आहे. या जोडप्याने स्वतः इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी जाहीर केली. रेहान आणि अवीवा यांचा साखरपुडा २९ डिसेंबर २०२५ रोजी पार पडल्याचे त्यांनी पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.Priyanka Gandhi–Robert Vadra
साखरपुड्याचे फोटो समोर येताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रॉबर्ट वाड्रा यांनीही मुलाच्या साखरपुड्यावर भावना व्यक्त करत, “मुलगा मोठा झाला आहे, त्याला जीवनसाथी मिळाली आहे. रेहानच्या आयुष्यात कायम आनंद आणि समाधान राहो,” अशा शब्दांत आशीर्वाद दिले.
यापूर्वी ३० डिसेंबर रोजी पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने रेहान वाड्रा यांच्या साखरपुड्याची माहिती दिली होती. त्यानंतर हे जोडपे कुटुंबासह राजस्थानमधील रणथंभोर येथे पोहोचले होते, जिथे साखरपुडा खासगी आणि कौटुंबिक वातावरणात पार पडल्याचे सांगितले जाते.
रेहान वाड्रा आणि अवीवा बेग गेल्या सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनाही फोटोग्राफीची विशेष आवड असून, हाच समान छंद त्यांच्या नात्याचा मजबूत पाया ठरला. सामाजिक कार्यक्रमांमध्येही हे जोडपे अनेकदा एकत्र दिसून आले आहे.
रेहान वाड्रा यांची होणारी पत्नी अवीवा बेग ही दिल्लीतील प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातून येते. तिचे वडील इम्रान बेग हे नामांकित व्यावसायिक असून, आई नंदिता बेग या प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहेत. विशेष म्हणजे, नंदिता बेग यांनीच काँग्रेस मुख्यालय इंदिरा भवनचे इंटिरियर डिझाइन केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियंका गांधी वाड्रा आणि नंदिता बेग या जुन्या मैत्रिणी आहेत.
मीडिया, कला आणि फोटोग्राफीमध्ये ठसा
अवीवाने मीडिया आणि कम्युनिकेशन क्षेत्रात काम केले आहे. तिने कंटेंट प्लॅटफॉर्म PROPAGANDA मध्ये ज्युनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळली असून, डिजिटल कंटेंट प्लॅटफॉर्म Art Chain India मध्ये मार्केटिंग इंटर्न म्हणूनही काम केले आहे.
याशिवाय, I-Parliament मध्ये प्रकाशित होणाऱ्या The Journal ची ती एडिटर-इन-चीफ राहिली आहे. Verve Magazine India आणि Creative IMAGE Magazine मध्येही तिने इंटर्नशिप केली आहे.
अवीवा ही Atelier 11 या फोटोग्राफिक स्टुडिओ आणि प्रोडक्शन कंपनीची सह-संस्थापक असून, ही कंपनी भारतभरातील एजन्सी, ब्रँड्स आणि विविध क्लायंट्ससोबत काम करते.
कला आणि संस्कृती क्षेत्रातही अवीवाचा सक्रिय सहभाग आहे. तिने इंडिया आर्ट फेअरच्या यंग कलेक्टर प्रोग्राम अंतर्गत ‘You Cannot Miss This’ (2023), द क्वोरम क्लबमधील ‘The Illusive World’ (2019) तसेच India Design ID – K2 India (2018) यांसारख्या प्रदर्शनांचे आयोजन केले आहे.
Priyanka Gandhi–Robert Vadra’s Son Rehan Vadra Gets Engaged to Aviva Beg
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन