Shinde Sena : शिवसेना शिंदे गटाचा निवडणुकीपूर्वीच गुलाल, राज्यभरात 13 नगरसेवक बिनविरोध

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Shinde Sena नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची परंपरा कायम राखत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने निवडणुकीपूर्वीच गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये त भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध झाले आहेत.Shinde Sena

122 सदस्य संख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 62 जगांपासून महायुती आता केवळ 53 जागा दूर आहे. भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता शिवसेना शिंदे गटाचेही 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांची खेळी यशस्वी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.Shinde Sena



कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पॅनल क्र. 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी तर प्रभाग क्र. 28 अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदारे राजेश मोरे यांचे हर्षल मोरे हे चिरंजीव आहेत. येथील सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या निवडणुका बिनविरोध झाल्या. तसेच याचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले जात आहे. भाजपने धुळे महानगरपालिकेत 2, पनवेल महानगरपालिकेत 1 जागा बिनविरोध करत, राज्यात 8 जागांवर बिनविरोध उमेदवार विजयी केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने केडीएमसीत 4, जळगावमध्ये 1 जागा बिनविरोध करत राज्यभरात 5 जागा बिनविरोध केल्या आहेत. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अहिल्यानगरमध्ये एक जागा बिनविरोध निवडून आली आहे.

Shinde Sena Celebrates Early Win, 13 Councillors Elected Unopposed Across Maharashtra

महत्वाच्या बातम्या