विशेष प्रतिनिधी
मुंबई : BMC Election मुंबईतून एकूण 453 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या (BMC Election) 227 जागांसाठी एकूण 1 हजार 729 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, 23 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत एकूण 11 हजार 391 नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या अंतिम दिवसापर्यंत म्हणजेच मंगळवार, 30 डिसेंबर रोजी एकूण 2 हजार 516 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. प्राप्त 2 हजार 516 नामनिर्देशनपत्रांची बुधवार, 31 डिसेंबर रोजी छाननी करण्यात आली. 164 नामनिर्देशन पत्रे छाननीत अवैध ठरली. तर, उर्वरित 2 हजार 185 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली. नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, 2 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत होती. या निर्धारित कालावधीत 453 नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यात आली. माघारीअंती स्पष्ट झालेल्या चित्रानुसार, 1 हजार 729 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. शनिवार 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून उमेदवारांना निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहे. चिन्ह वाटप पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी शनिवार, 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ए + बी + ई विभाग (RO 23) – 19 / 92
> सी + डी विभाग (RO 22) – 05 / 44
> एफ दक्षिण विभाग (RO 21 ) – 21 / 50
> जी दक्षिण विभाग (RO 20) – 14 / 51
> जी उत्तर विभाग (RO 19) – 18 / 109
> एफ उत्तर विभाग (RO 18) – 25 / 93
> एल विभाग (RO 17) – 20 / 76
> एल विभाग (RO 16) – 24 / 74
> एम पूर्व विभाग (RO 15) – 41 / 121
> एम पूर्व + एम पश्चिम (RO 14) – 44 / 97
> एन विभाग (RO 13) – 34 / 88
> एस विभाग (RO 12) – 15 / 70
> टी विभाग (RO 11) – 24 / 79
> एच पूर्व विभाग (RO 10) – 25/ 87
> के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO 9) – 12 / 58
> के पश्चिम विभाग + के पूर्व (RO 8) – 18 / 82
> के पश्चिम विभाग (RO 7) – 18 / 104
> पी दक्षिण विभाग (RO 6) – 14 / 56
> पी पूर्व विभाग (RO 5) – 21 / 81
> पी उत्तर विभाग (RO 4) – 11 / 60
> आर दक्षिण विभाग (RO 3) – 10 / 83
> आर मध्य विभाग (RO 2) – 07 / 35
> आर उत्तर विभाग (RO 1) – 13 / 39
BMC Election : 453 applications withdrawn from Mumbai, total 1729 candidates in the election fray
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut : संजय राऊतांच्या घराबाहेर ‘बॉम्ब’ची धमकी! बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
- ईव्हीएमवरील ईएनडी बटण बंद, मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी निर्णय
- निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत मेधा कुलकर्णींची सूचक पोस्ट; म्हणाल्या, ‘कुछ कह गए, कुछ सह गए…’,
- लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; आरटीआयमधून मोठा गैरप्रकार उघड