Uddhav Thackeray : सूर्याजी पिसाळ जसा ४०० वर्षांनंतरही गद्दार म्हणून ओळखला जातो, तसाच मिंधेही लक्षात राहील, उद्धव ठाकरेंची विखारी टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray महानगरपालिकेची निवडणूक ही मुघलांविरुद्ध लढलेल्या ऐतिहासिक संघर्षाइतकीच निर्णायक असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. “सूर्याजी पिसाळ जसा ४०० वर्षांनंतरही गद्दार म्हणून ओळखला जातो, तसाच मिंधेही लक्षात राहील,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.Uddhav Thackeray

मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी केवळ एकनाथ शिंदेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. “दोन गुजरात्यांच्या हातात मुंबई द्यायची नाही,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आणि मनापासून लढण्याचे आवाहन केले. समोरून मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव होईल, पण एकही जागा नतद्रष्टांच्या हाती जाऊ देऊ नका, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.Uddhav Thackeray



उद्धव ठाकरे म्हणाले की, सूर्याजी पिसाळवर लागलेला गद्दारीचा डाग चार शतके उलटूनही पुसला गेलेला नाही, मग आजचे गद्दार इतिहासात कसे लक्षात राहतील, याची कल्पनाच केलेली बरी. जे उमेदवार आता मैदानात उतरले आहेत, ते सर्व निवडून आले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, दादर येथील शिवसेना भवनात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे मुंबई महानगरपालिकेच्या उमेदवारांसमोर एक महत्त्वपूर्ण प्रेझेंटेशन सादर केले. सत्ता मिळाल्यानंतर मुंबईच्या विकासासाठी कोणते ठोस निर्णय घेतले जातील, याचा सविस्तर आराखडा यामध्ये मांडण्यात आला. हे प्रेझेंटेशन अंतिम मंजुरीसाठी उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सादर केले जाणार असून, त्यांच्या सूचनांनुसार सुधारणा करून मुंबईकरांसाठी अधिकृत ‘वचननामा’ जाहीर केला जाणार आहे.

या वचननाम्यात महापालिकेच्या मालकीची जमीन खासगी विकासकांना न देता, शासकीय, महापालिका, बेस्ट, पोलिस कर्मचारी तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेचे स्वतंत्र गृहनिर्माण प्राधिकरण स्थापन केले जाईल आणि पुढील पाच वर्षांत एक लाख मुंबईकरांना परवडणारी घरे दिली जातील, असेही आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Like Suryaaji Pisal, ‘Mindhe’ Will Be Remembered as a Traitor for Centuries,” Uddhav Thackeray’s Scathing Attack

महत्वाच्या बातम्या