विशेष प्रतिनिधी
पुणे : Mohol Targets Ajit Pawar शहरातील गुन्हेगारी संपवण्याच्या घोषणा केल्या जात असताना प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारी यादीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा समावेश कसा होतो, असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला. “शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे, असे पालकमंत्री अजित पवार सांगतात. मात्र त्यांच्या पक्षाची उमेदवारी यादी पाहिली तर त्यात गुन्हेगारांचा समावेश दिसतो. हे कोणत्या तत्त्वात बसते, ते त्यांनी स्पष्ट करावे,” अशी टीका मोहोळ यांनी केली.Mohol Targets Ajit Pawar
भाजपच्या मीडिया सेलच्या उद्घाटनानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजय मयेकर आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.Mohol Targets Ajit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपकडूनही काही ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याचा आरोप होत असल्याबाबत विचारले असता, मोहोळ म्हणाले की भाजपची भूमिका याबाबत स्पष्ट आहे. “गुन्हेगारांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही सकारात्मक नाही. वार्ड क्रमांक ३८ मधील रोहिदास चोरघे यांच्या पत्नी प्रतिभा चोरघे या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या पतींची गुन्हेगारी पार्श्वभूमी मला माहिती नाही. मात्र एकंदरीत गुन्हेगारांना राजकारणात स्थान नसावे, हीच आमची ठाम भूमिका आहे,” असे त्यांनी सांगितले.
तथापि, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी थेट बोट दाखवले. “एकीकडे पालकमंत्री शहरातील गुन्हेगारी संपवण्याची भाषा करतात, पण त्यांच्या पक्षाच्या उमेदवारी यादीकडे पाहिले तर शहराच्या दोन्ही टोकांवर गुन्हेगारांचा समावेश दिसतो. हा दुहेरी निकष पुणेकर स्वीकारणार नाहीत. याचे उत्तर मतदार मतपेटीतून देतील,” असा इशाराही मोहोळ यांनी दिला.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या भूमिकेवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. “२०१७ मध्ये भाजपचे १०५ नगरसेवक असतानाही आम्ही युतीत निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती. आजही शिंदे गटाबरोबर युती राहावी, अशी आमची भूमिका आहे. मात्र शिंदे गट एका नगरसेवकाच्या जीवावर स्वबळावर सर्व जागा लढवण्याची भाषा करत आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
युतीबाबत अद्यापही चर्चा सुरू असल्याचे सांगत मोहोळ म्हणाले की, वरिष्ठ पातळीवर संवाद चालू आहे. “आमची भूमिका स्पष्ट आहे. पुण्यात स्थिर आणि सक्षम महापालिका देण्यासाठी युती महत्त्वाची आहे. मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Crime-Free Pledge Rings Hollow as Criminals Get Tickets, Mohol Targets Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut : संजय राऊतांच्या घराबाहेर ‘बॉम्ब’ची धमकी! बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
- ईव्हीएमवरील ईएनडी बटण बंद, मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी निर्णय
- निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत मेधा कुलकर्णींची सूचक पोस्ट; म्हणाल्या, ‘कुछ कह गए, कुछ सह गए…’,
- लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; आरटीआयमधून मोठा गैरप्रकार उघड