विशेष प्रतिनिधी
पुणे : Rohit Pawar मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) निवडणुकांना स्थगिती दिल्याने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. ६ जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुका न्यायालयाच्या आदेशामुळे तूर्तास थांबवण्यात आल्या आहेत. मतदार यादीतील कथित गैरप्रकार आणि घराणेशाहीचे आरोप यामुळे हा वाद चिघळला आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप नेते केदार जाधव यांनी एमसीएच्या विद्यमान नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून निवडणुकीआधीच मोठ्या प्रमाणात नवीन आजीवन सदस्यांची नोंदणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. अवघ्या काही दिवसांत तब्बल ४०१ नवीन सदस्य जोडले गेल्याचा आरोप आहे. Rohit Pawar
२५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत एमसीएचे सदस्यसंख्या सुमारे १५० वरून थेट ६०० हून अधिक झाल्याचे समोर आले आहे. इतक्या कमी कालावधीत एवढी मोठी वाढ कशी झाली, असा थेट सवाल केदार जाधव यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाला राजकीय रंग देणारे आरोपही पुढे आले आहेत. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये रोहित पवारांचे १८ नातेवाईक, ५६ व्यावसायिक भागीदार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३७ पदाधिकारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. बारामती अॅग्रोशी संबंधित कर्मचारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे निकटवर्तीयही या यादीत असल्याचे आरोप आहेत.
वाद आणखी वाढला असून, मतदार यादीत रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, पवार कुटुंबातील इतर सदस्य आणि सुप्रिया सुळे यांच्या मुलीचे नाव असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे एमसीएवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच हा सदस्य नोंदणीचा डाव आखल्याचा आरोप बळावला आहे.
Bombay High Court Stays MCA Elections, Major Setback for Rohit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut : संजय राऊतांच्या घराबाहेर ‘बॉम्ब’ची धमकी! बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
- ईव्हीएमवरील ईएनडी बटण बंद, मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी निर्णय
- निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत मेधा कुलकर्णींची सूचक पोस्ट; म्हणाल्या, ‘कुछ कह गए, कुछ सह गए…’,
- लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; आरटीआयमधून मोठा गैरप्रकार उघड