विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ambernath अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाशी युती करणाऱ्या बारा नगरसेवकांना काॅंग्रेस पक्षाने दणका दिला आहे. या बाराही नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.Ambernath
अंबरनाथ नगरपालिकेत सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत हातमिळवणी करत ‘ अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली. या गटाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या गटात भाजपचे १४, काँग्रेसचे १२, तर राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार व एक अपक्ष असे ३१ नगरसेवक आहेत. नगराध्यक्षांसह ही संख्या ३२ झाली. अंबरनाथ नगरपालिकेला भ्रष्टाचार आणि भयमुक्त करण्याकरता हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपने केला. यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या युतीवर टीका हाेऊ लागली हाेती.Ambernath
काँग्रेसने त्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.काँग्रेसने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, आपण अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असून आपल्या पक्षाचे बारा सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र आपण प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचे प्रसार माध्यमांद्वारे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे. ही बाब लक्षात घेता प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. तसेच आपली ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे आपल्यासोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांना सुद्धा पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे.
मी स्पष्ट शब्दात सांगतोय काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणतीही आघाडी चालणार नाही. ही आघाडी तोडावी लागेल. जर स्थानिक पातळीवर ही गोष्ट कोणी केली असेल, तर ते चुकीचे आहे. हा शिस्तभंग आहे. याच्यावर कारवाई होणार. हे चालणार नाही. मी आदेश दिले आहेत आणि १०० टक्के यावर कारवाई होणार,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली नाराजी व्यक्त केली.
अंबरनाथ शहरवासीयांना अभिप्रेत असलेला विकास व्हावा, या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर आम्ही एकत्रित आलो आहोत. शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. द्वेषाचे राजकारण सोडून शहर विकासाचे राजकारण करू”, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी युतीच्या घोषणे वेळी दिले होते.
Twelve corporators from Ambernath who allied with BJP suspended by Congress
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन